अश्लील चित्रफीत तयार करुन पैसे कमावून दे, पत्नीकडे मागणी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ‘अश्लील चित्रफीत तयार करून पैसे कमावून दे’ या मागणीसाठी पतीसह सासरच्या सात नातलगांनी विवाहितेचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विवाहितेने देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांविरोधात छळ, मारहाण, शिवीगाळ प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २०२० मध्ये अहमदनगर येथील एकासोबत विवाह झाला. विवाहानंतर वाहन व घर बांधण्यासाठी पतीसह सासरच्या नातलगांनी विवाहितेचा छळ केला. तर भंगार व्यावसायिक असलेल्या पतीने पत्नीकडे धक्कादायक मागणी केली. विवाहितेस अश्लील व्हिडिओ बनवण्यास सांगत त्यातून पैसे कमवून आम्हाला दे, अशी मागणी पतीने केली. त्यास विवाहितेने नकार दिल्याने पतीसह सासरच्या नातलगांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :
नांदेड: कापूस वेचणाऱ्या महिलेची छेड काढणाऱ्या लाईनमनविरूद्ध गुन्हा दाखल
शेतकऱ्याच्या घराला आग लागून लाखोंचे नुकसान
Manoj Jarange Patil In Nashik : काहींचे हिशोब चुकते करायचे आहेत : जरांगे पाटील
The post अश्लील चित्रफीत तयार करुन पैसे कमावून दे, पत्नीकडे मागणी appeared first on पुढारी.
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ‘अश्लील चित्रफीत तयार करून पैसे कमावून दे’ या मागणीसाठी पतीसह सासरच्या सात नातलगांनी विवाहितेचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विवाहितेने देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांविरोधात छळ, मारहाण, शिवीगाळ प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २०२० मध्ये अहमदनगर येथील एकासोबत विवाह झाला. विवाहानंतर …
The post अश्लील चित्रफीत तयार करुन पैसे कमावून दे, पत्नीकडे मागणी appeared first on पुढारी.