
चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपूर चंद्रपूर मार्गावरील भद्रावती तालुक्यातील कोंढा नाल्यात कोसळून पेट घेतलेल्या कारमध्ये होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. मृत्यूमुखी पडलेला व्यक्ती हा सिआयएसएफचा जवान आहे. तो जामनगर गुजरात येथे कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी तो रजेवर आला होता. भद्रावती तालुक्यातील मल्हारी बाबा सोसायटी, सुमठाणा येथील निवासी होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (दि. ८ शुक्रवारी) पहाटेच्या सुमारास 23 बिएच 68550 क्रमांकाच्या कारने चालक हा चंद्रपूर नागपूर मार्गावरील भद्रावतीच्या दिशेने येत असताना नागपूर चंद्रपूर मार्गावरील पुलावर भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची पुलाच्या डिवाईडला जबर धडक झाली. त्यानंतर कार नाल्यात कोसळली. कारमध्ये शार्ट सर्किट झाल्याने कारने पेट घेतला. कारमधून चालकाने बाहेर पडल्याचा प्रयत्न केला परंतु तो बाहेर निघून शकला नाही. यावेळी तो फक्त एकटाच होता. त्यामुळे त्याचा कारमध्ये होरपळून मृत्यू झाला. सकाळी काही नागरिकांना नाल्यात कार पेटलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर भद्रावती पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन कारमध्ये अर्धवट होरपळलेल्या अवस्थेत इसमाचा मृतदेह ताब्यात घेतला. अपघातात जळालेली कार भद्रावती येथील असल्याची माहिती समोर आल्यानंतर मृतकाची भद्रावती पोलिसांनी शोध घेतला. पोलिसांना मिळालेल्या माहितीद्वारे 35 वर्षीय मृतकाचे दीपक चरण बघेल असे नाव आहे. तो सिआयएसएफ मध्ये जवान होता. तो जामनगर गुजरात येथे कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी तो रजेवर आला होता. भद्रावती तालुक्यातील मल्हारी बाबा सोसायटी, सुमठाणा येथील रहिवासी होता.
Latest Marathi News भद्रावती तालुक्यातील नाल्यात कार कोसळून झालेल्या ‘त्या’ अपघातात सिआयएसएफच्या जवानाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
