सोलापूर : बारावीचा पेपर अवघड गेल्याने तरूणीने संपविले जीवन

नातेपुते; Bharat Live News Media वृत्तसेवा : धर्मपुरी (ता.माळशिरस) येथील तरूणीने बारावीचा पेपर अवघड गेल्याने गुरूवारी (दि.७) राहत्या घरी जीवन संपविले. किरण भाऊसो पाटोळे (वय १७) असे मृत तरूणीचे नाव आहे. ती नातेपुते येथील डॉ बाळकृष्ण दाते प्रशाला येथे किरण विज्ञान शाखेत शिकत होती.
किरण बारावीचे पेपर अवघड गेल्याने नाराज होती. गुरूवारी सायंकाळी सातच्या सुमारास ती भावंडांबरोबर गप्पा मारून आपल्या खोलीत गेली. बराच वेळ झाला ती खोलीबाहेर आली नसल्याने आईने तिच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. आतून काहीच प्रतिसाद न आल्याने आईने कुटुंबातील लोकांना याची माहिती दिली. कुटुंबियांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तिने जीवन संपविल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याबाबत अधिक तपास नातेपुते पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.को जावेद जमादार करत आहेत.
हेही वाचा :
सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात शिकारीसाठी जंगलात ठेवलेले ९ गावठी बॉम्ब हस्तगत, दोघे ताब्यात
Nashik Fraud News : किराणा व्यावसायिकाचा पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी अर्ज, 46 लाखांची फसवणूक
Nashik Accident : इगतपुरीतील उंबरकोन फाट्याजवळ भीषण अपघात, 4 जण जागीच ठार
Latest Marathi News सोलापूर : बारावीचा पेपर अवघड गेल्याने तरूणीने संपविले जीवन Brought to You By : Bharat Live News Media.
