इगतपुरीतील उंबरकोन फाट्याजवळ अपघात, 4 जण ठार

इगतपुरी Bharat Live News Media वृत्तसेवा- इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर महामार्गावरील उंबरकोन फाट्याजवळ कार व मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाले आहेत.
शुक्रवार (दि. 8) दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. मोटारसायकल आणि चारचाकी वाहनाचा हा अपघात इतका भीषण होता की, यात 4 जण जागीच ठार झाले आहेत.
अपघातातील गंभीर जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी घोटी पोलीस दाखल झाले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. मृत आणि जखमी व्यक्तींची नावे समजली नसून पोलिस ओळख पटविण्याचे काम करत आहेत.
हेही वाचा
रोहित पवारांना ED चा सर्वात मोठा झटका; ‘बारामती अॅग्रो’ प्रकरणातील कन्नड कारखाना जप्त
इनकम टॅक्स प्रकरणी काँग्रेसला झटका : बँक खाती गोठवण्याविरोधातील पक्षाचे अपील फेटाळले
Latest Marathi News इगतपुरीतील उंबरकोन फाट्याजवळ अपघात, 4 जण ठार Brought to You By : Bharat Live News Media.
