नितीन गडकरी ‘मविआ’त आले तर स्वागतच : नाना पटोले

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी बरोबरीचे नेते आहेत. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली? मला ते माहीत नाही. पण नितीन गडकरी महाविकास आघाडीमध्ये आले, तर त्यांचे स्वागतच आहे, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. एकंदरीत गडकरींचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत नसल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आधी … The post नितीन गडकरी ‘मविआ’त आले तर स्वागतच : नाना पटोले appeared first on पुढारी.
नितीन गडकरी ‘मविआ’त आले तर स्वागतच : नाना पटोले

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी बरोबरीचे नेते आहेत. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली? मला ते माहीत नाही. पण नितीन गडकरी महाविकास आघाडीमध्ये आले, तर त्यांचे स्वागतच आहे, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
एकंदरीत गडकरींचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत नसल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आधी सिलिंडर दर वाढविले, आता कमी केले, ही बनियागिरी आहे. दोन दिवसांपूर्वी गॅसचे दर वाढवले आणि दुकानात जसा सेल लागतो, तसा हा सेल आहे. गेल्या दहा वर्षांपासून महिलांच्या आणि त्यांच्या मुलाबाळांच्या तोंडातला घास काढण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. त्यामुळे याला काही नाविन्यपूर्ण म्हणता येणार नाही, असेही पटोले म्हणाले.
हेही वाचा 

Dhule Lok Sabha : धुळे लोकसभेची जागा कॉंग्रेसला : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती
सरकार आत्ताच जागे का झाले? : नाना पटोले यांचा सवाल
हिंगोली : औंढा-वसमत येथे रमेश चेन्नीथला, नाना पटोले यांचे स्वागत

Latest Marathi News नितीन गडकरी ‘मविआ’त आले तर स्वागतच : नाना पटोले Brought to You By : Bharat Live News Media.