रोहित पवारांना ED चा सर्वात मोठा झटका; ‘बारामती अ‍ॅग्रो’ प्रकरणातील कन्नड कारखाना जप्त

पुढारी ऑनलाईन डेस्क :  शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांना ईडीकडून मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या बारामती Agro या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता आज ईडीने जप्त केल्याची माहिती दिली आहे. या कारवाईनंतर आता पवारांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कारखान्याची १६१ एकर जमीन ईडीने जप्त केल्याची … The post रोहित पवारांना ED चा सर्वात मोठा झटका; ‘बारामती अ‍ॅग्रो’ प्रकरणातील कन्नड कारखाना जप्त appeared first on पुढारी.
रोहित पवारांना ED चा सर्वात मोठा झटका; ‘बारामती अ‍ॅग्रो’ प्रकरणातील कन्नड कारखाना जप्त

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :  शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांना ईडीकडून मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या बारामती Agro या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता आज ईडीने जप्त केल्याची माहिती दिली आहे. या कारवाईनंतर आता पवारांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

कारखान्याची १६१ एकर जमीन ईडीने जप्त केल्याची माहिती एक्सवर पोस्ट करुन दिली आहे. ५०.२० कोटी रुपयांच्या या मालमत्तेवर ईडीने कारवाई करत जप्त केली आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांची ईडीकडून दोन ते तीनवेळा चौकशी झालेली आहे. आता छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे.

ED, Mumbai has attached 161.30 acres of land, plant & machinery and building structures of a sugar unit at Kannad, Aurangabad presently in possession of M/s Baramati Agro Ltd. worth Rs. 50.20 Crore under PMLA in a case related to illegal sale of Sugar factories by Maharashtra…
— ED (@dir_ed) March 8, 2024

हेही वाचा

Latest Marathi News रोहित पवारांना ED चा सर्वात मोठा झटका; ‘बारामती अ‍ॅग्रो’ प्रकरणातील कन्नड कारखाना जप्त Brought to You By : Bharat Live News Media.