परभणी: फुकटगाव शिवारात रेल्वेच्या धडकेत महिला जागीच ठार

पूर्णा: पुढारी वृत्तसेवा : परभणी- पूर्णा लोहमार्गावरील फूकटगाव शिवारातील गायरान भागात दुतोंडी पुलाजवळ आज (दि. ८) दुपारी अडीचच्या सुमारास पूर्णेहून परभणीकडे जाणा-या काचीगुडा मनमाड रेल्वे गाडीच्या धडकेत एका अनोळखी महिला ( वय ४५) जागीच ठार झाली.  ही दु:खद घटना जागतिक महिला दिनीच घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अंगात लाल गुलाबी रंगाची साडी असलेल्या … The post परभणी: फुकटगाव शिवारात रेल्वेच्या धडकेत महिला जागीच ठार appeared first on पुढारी.

परभणी: फुकटगाव शिवारात रेल्वेच्या धडकेत महिला जागीच ठार

पूर्णा: Bharat Live News Media वृत्तसेवा : परभणी- पूर्णा लोहमार्गावरील फूकटगाव शिवारातील गायरान भागात दुतोंडी पुलाजवळ आज (दि. ८) दुपारी अडीचच्या सुमारास पूर्णेहून परभणीकडे जाणा-या काचीगुडा मनमाड रेल्वे गाडीच्या धडकेत एका अनोळखी महिला ( वय ४५) जागीच ठार झाली.  ही दु:खद घटना जागतिक महिला दिनीच घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंगात लाल गुलाबी रंगाची साडी असलेल्या मृत महिलेला रेल्वे इंजिनची जबरदस्त धडक बसताच महिला लांब उडून पुढे दोन्ही लोहमार्ग रुळामध्ये जावून पडली. यात तिचा एक पाय तुटून लांब अंतरावर पडला. तर उर्वरित शरीराचा चेंदामेंदा झाला. फुकटगाव शिवारातील गायरान भाग परिसरातील दुतोंडी पुल येथे नागरिकांनी गर्दी केली होती. या महिलेच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला जात आहे. तिची ओळख अद्याप पटलेली नाही.
दरम्यान, या रेल्वे अपघाताची  माहिती मिळताच पूर्णा ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास गोबाडे,पोउनि केंद्रे, बिट जमादार मुजमूले, पोलिस कर्मचारी यादव यांनी घटनास्थळी  धाव घेतली. पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा 

Paper Leak Case : परभणीत बारावी जीवशास्त्रचा पेपर फुटल्यामुळे खळबळ
परभणी : टेम्पोच्या धडकेत मजूर जागीच ठार, एक गंभीर
परभणी: पूर्णा येथे घराला लागलेल्या आगीत संसारपयोगी साहित्य जळून खाक

Latest Marathi News परभणी: फुकटगाव शिवारात रेल्वेच्या धडकेत महिला जागीच ठार Brought to You By : Bharat Live News Media.