पंकजा मुंडे यांनी घेतले कुटुंबियांसमवेत वैजनाथाचे दर्शन

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : बीडच्या पावन धर्तीवर असलेले पाचवे ज्योतिर्लिंग मंदिर प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी आज (दि.८) हजारो भाविक दाखल झाले आहेत. परळीत मोठ्या उत्साहात आजपासून महाशिवरात्री पर्व साजरे केले जात आहे. या अनुषंगाने माजी मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सहकुटुंब प्रभू वैजनाथाचे दर्शन घेतले. यावेळी मुंडे यांच्यासोबत मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, बहीण … The post पंकजा मुंडे यांनी घेतले कुटुंबियांसमवेत वैजनाथाचे दर्शन appeared first on पुढारी.

पंकजा मुंडे यांनी घेतले कुटुंबियांसमवेत वैजनाथाचे दर्शन

परळी वैजनाथ, Bharat Live News Media वृत्तसेवा : बीडच्या पावन धर्तीवर असलेले पाचवे ज्योतिर्लिंग मंदिर प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी आज (दि.८) हजारो भाविक दाखल झाले आहेत. परळीत मोठ्या उत्साहात आजपासून महाशिवरात्री पर्व साजरे केले जात आहे. या अनुषंगाने माजी मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सहकुटुंब प्रभू वैजनाथाचे दर्शन घेतले.
यावेळी मुंडे यांच्यासोबत मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, बहीण खा. डॉ.प्रीतम मुंडे व त्यांचा मुलगा चि. अगस्त्य असे कुटुंबीय उपस्थित होते. प्रभू वैजनाथाच्या दर्शनानंतर त्यांनी मंदिर परिसरातील भाविकांशी संवाद साधला. तसेच भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित साबुदाणा खिचडी वाटप स्टॉलवर हजेरी लावत दर्शनार्थी भाविकांना फराळ खिचडीचे वाटपही केले. यावेळी त्यांच्या समवेत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :

महाशिवरात्री : मंत्री धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथाचे घेतले दर्शन; शेतकरी-कष्‍टकऱ्यांसाठी केली प्रार्थना
महाशिवरात्र: जिरेवाडीहून श्री सोमेश्वराचा पालखी सोहळा ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या भेटीला!
Maha Shivratri 2024 : ठाण्यातील श्री कौपिनेश्वर मंदिर महाशिवरात्रीनिमित्त सज्ज; ज्येष्ठ नागरिकांसाठी मंदिरात स्वतंत्र रांग

Latest Marathi News पंकजा मुंडे यांनी घेतले कुटुंबियांसमवेत वैजनाथाचे दर्शन Brought to You By : Bharat Live News Media.