रस्त्यावर नमाज पडणाऱ्याला लाथ मारली; दिल्लीत पोलिस निलंबित

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील इंद्रलोक येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्या काही मुस्लिमांना एक पोलिस लाथ मारत असल्याचे दिसते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर दिल्लीचे डीसीपी मनोज मीना यांनी संबंधित पोलिसाला निलंबित केले असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. (Delhi Police Namaz Controversy) या … The post रस्त्यावर नमाज पडणाऱ्याला लाथ मारली; दिल्लीत पोलिस निलंबित appeared first on पुढारी.

रस्त्यावर नमाज पडणाऱ्याला लाथ मारली; दिल्लीत पोलिस निलंबित

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील इंद्रलोक येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्या काही मुस्लिमांना एक पोलिस लाथ मारत असल्याचे दिसते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर दिल्लीचे डीसीपी मनोज मीना यांनी संबंधित पोलिसाला निलंबित केले असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. (Delhi Police Namaz Controversy)
या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडियावर बरीच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांनी हा व्हिडिओ त्यांच्या एक्स खात्यावर शेअर केला आहे. ते म्हणाले, “हा पोलिस कर्मचारी माणुसकी विसरला असावा. पोलिसांच्या मनात असा कोणता द्वेष निर्माण झाला आहे? दिल्ली पोलिसांनी या पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी.” ही बातमी आजतकने दिलेली आहे.  (Delhi Police Namaz Controversy)

इंद्रलोक दिल्ली में नमाज़ पढ़ते हुए व्यक्ति को लात मारने वाले पुलिसकर्मी को सस्पेंड कर दिया गया है, लेकिन सवाल अब भी वही है कि एैसा पुलिसकर्मी जिनका सांप्रदायिक चेहरा कैमरे में कैद है उस पर सुसंगत धाराओं में FIR कब दर्ज होगी ??@DelhiPolice आप तो राजधानी की पुलिस हैं, आपको तो…
— Imran Pratapgarhi (@ShayarImran) March 8, 2024

या व्हिडिओत रस्त्याच्या बाजूला काही मुस्लिम युवक नमाज पठण करत असल्याचे दिसते. काही पोलिसांनी या युवकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका पोलिसाने नमाज पठण करणाऱ्या युवकाला लाथ मारली. त्यानंतर येथे गर्दी जमा झाली आणि वातावरण तणावपूर्ण बनले. हा व्हिडिओ त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हेही वाचा

दिल्ली पोलिसांची कारवाई; आठ महिन्यांपासून फरार अंमली पदार्थ तस्कराला अटक
दिल्ली पोलिसांची नाशिकमध्ये वेटरची चौकशी; गुड्डु मुस्लिम संबंधाची अफवा
Ayodhya Ram Mandir Inauguration : मुस्लिम राष्ट्रीय मंचकडून रामलल्लासाठी काश्मिरी केशर

Latest Marathi News रस्त्यावर नमाज पडणाऱ्याला लाथ मारली; दिल्लीत पोलिस निलंबित Brought to You By : Bharat Live News Media.