भारत-अफगाणिस्तान पहिल्यांदाच टी20 मालिकेत भिडणार, जाणून घ्या वेळापत्रक

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AFG T20 Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात प्रथमच द्विपक्षीय मालिका होणार आहे. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात ही मालिका रंगणार आहे. आतापर्यंत या दोन्ही संघांनी केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळले आहेत. अफगाणिस्तान पुरुष क्रिकेट संघ जानेवारीत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येईल, अशी घोषणा अफगाणिस्तान … The post भारत-अफगाणिस्तान पहिल्यांदाच टी20 मालिकेत भिडणार, जाणून घ्या वेळापत्रक appeared first on पुढारी.

भारत-अफगाणिस्तान पहिल्यांदाच टी20 मालिकेत भिडणार, जाणून घ्या वेळापत्रक

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AFG T20 Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात प्रथमच द्विपक्षीय मालिका होणार आहे. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात ही मालिका रंगणार आहे. आतापर्यंत या दोन्ही संघांनी केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळले आहेत. अफगाणिस्तान पुरुष क्रिकेट संघ जानेवारीत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येईल, अशी घोषणा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) मंगळवारी केली. ही मालिका 11 जानेवारीपासून सुरू होणार असून 17 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

Gautam Gambhir KKR Mentor IPL 2024 | गौतम गंभीरची शाहरुखच्या ‘केकेआर’मध्ये वापसी, मिळाली ‘ही’ जबाबदारी

मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला मोहालीत, दुसरा सामना 14 जानेवारीला इंदूरमध्ये आणि तिसरा आणि सामना 17 जानेवारीला बंगळूरमध्ये खेळवला जाईल. दरम्यान, या मालिकेसाठी संघ अद्याप जाहीर झालेले नाहीत. लवकरच संघाची घोषणा होईल असे सांगण्यात आले आहे. (IND vs AFG T20 Series)
भारत-अफगाणिस्तानचे संघ आत्तापर्यंत पाच टी-20 सामन्यांत आमनेसामने आले आहेत, त्यातील सर्व भारताने जिंकले आहेत. अफगाणिस्तानने अलीकडेच आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा दौरा केला, जिथे त्यांनी इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका या माजी विश्वविजेत्या संघांविरुद्ध संस्मरणीय विजय नोंदवला आणि गुणतालिकेत सहावे स्थान मिळविले.
मालिकेचे वेळापत्रक (IND vs AFG T20 Series)
पहिला टी-20 सामना : 11 जानेवारी, मोहाली
दुसरा टी-20 सामना : 14 जानेवारी, इंदूर
तिसरा टी-20 सामना : 17 जानेवारी, बंगळूर
भारत आणि अफगाणिस्तान संघांमध्ये 2018 साली एका कसोटी सामन्याची द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली होती. अफगाण संघाचा तो पहिला कसोटी सामना होता. ज्यात टीम इंडियाने एक डाव आणि 262 धावांनी विजय मिळवला होता. परंतु अद्यापही उभय संघांमध्ये एकही टी-20, एकदिवसीय मालिका खेळली गेलेली नाही. मात्र, अफगाणिस्तान संघाने भारतीय मैदानांवर इतर संघांविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळली आहे.
एकदिवसीय विश्वचषकानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर टीम इंडियाला डिसेंबरमध्ये द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर जायचे आहे. आता जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षी जूनमध्ये टी-20 विश्वचषकही खेळवला जाणार आहे.
The post भारत-अफगाणिस्तान पहिल्यांदाच टी20 मालिकेत भिडणार, जाणून घ्या वेळापत्रक appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AFG T20 Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात प्रथमच द्विपक्षीय मालिका होणार आहे. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात ही मालिका रंगणार आहे. आतापर्यंत या दोन्ही संघांनी केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळले आहेत. अफगाणिस्तान पुरुष क्रिकेट संघ जानेवारीत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येईल, अशी घोषणा अफगाणिस्तान …

The post भारत-अफगाणिस्तान पहिल्यांदाच टी20 मालिकेत भिडणार, जाणून घ्या वेळापत्रक appeared first on पुढारी.

Go to Source