भयंकर | बटर चिकन ठरले जीवघेणे, पहिल्या घासात युवकाचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : बटर चिकन ही भारतातील प्रसिद्ध डिश जगभरात पोहोचली आहे. अनेकांची ही अत्यंत आवडीची डिश आहे. पण लंडनमध्ये बटर चिकन खाल्ल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. बटर चिकनचा पहिला घास घेताच, या युवकाला अॅलर्जिक रिअॅक्शन आली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. २०२३च्या या घटनेत स्थानिक न्यायालयाने संबंधित बटर चिकन बनवणाऱ्या टेकअवेचा दोष नसल्याचा … The post भयंकर | बटर चिकन ठरले जीवघेणे, पहिल्या घासात युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

भयंकर | बटर चिकन ठरले जीवघेणे, पहिल्या घासात युवकाचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बटर चिकन ही भारतातील प्रसिद्ध डिश जगभरात पोहोचली आहे. अनेकांची ही अत्यंत आवडीची डिश आहे. पण लंडनमध्ये बटर चिकन खाल्ल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. बटर चिकनचा पहिला घास घेताच, या युवकाला अॅलर्जिक रिअॅक्शन आली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. २०२३च्या या घटनेत स्थानिक न्यायालयाने संबंधित बटर चिकन बनवणाऱ्या टेकअवेचा दोष नसल्याचा निर्वाळा गुरुवारी दिला आहे. (Butter Chicken Death)
जोसेफ हिगिन्सन (२७) असे या युवकाचे नाव आहे. इंग्लंडमधील ग्रेटर मॅचेंस्टर येथे ही घटना घडली. जोसेफ याने एका टेकअवेमधून घरी बटर चिकन पार्सल आणले होते. ही घटना जानेवारी २०२३ची आहे. त्यानंतर या प्रकरणात चौकशी झाली, आणि न्यायालयात सुनावणीही झाली, त्यात स्थानिक न्यायालयाने या प्रकरणात संबंधित टेकअवेला (पार्सल सेवा देणारे हॉटेल) गुरुवारी निर्दोष ठरवले आहे. द मिरर या वेबसाईटने ही बातमी दिली आहे.
नेमका मृत्यू कशामुळे? Butter Chicken Death
जोसेफने २८ डिसेंबर २०२२ला घरी बटर चिकन आणले होते. सहकुटुंब त्यांनी जेवण सुरू केले होते, त्यातच पहिला घास घेताच जोसेफला हृदयविकाराचा झटका आला. जोसेफला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पुढे ४ जानेवारी २०२३ला त्याचा मृत्यू झाला.
जोसेफला बदाम, काजू अशा ‘Nuts’ प्रकारतील खाद्यपदार्थाची अॅलर्जी होती. बटर चिकन बनवताना त्यात बदाम आणि काजू वापरले होते. हे बटर चिकन खाताच त्याला रिअॅक्शन आली. अशा तीव्र रिअॅक्शनला Anaphylaxis असे म्हटले जाते आणि ही रिअॅक्शन जीवघेणी असते.
जोसेफला त्याच्या अॅलर्जीबद्दल माहिती होती. तर या बटर चिकनमध्ये काजू, बदाम आहेत, असा स्पष्ट उल्लेख केलेला होता. असे असतानाही जोसेफ याने हे बटर चिकन खाल्ले. विशेष म्हणजे अशी रिअॅक्शन आली तर शरीराने त्याला उत्तर द्यावे यासाठी बनवण्यात आलेले वैद्यकीत उपकरण EpiPenही त्याच्या शरीरात बसवण्यात आले आहे. अशा स्थितीत जोसेफ असे वेडे धाडस करायला नको होते, लोकांनी या घटनेतून धडा घेत अॅलर्जी गांभीर्याने घ्यावी, असे जोसेफच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.ृ
हेही वाचा

Butter Chicken : बटर चिकन खाताय, पण हे आलं तरी कुठून? 

Chicken tikka Masala : खवय्यांना ‘चिकन टिक्का मसाला’ डिश देणारे अली अहमद अस्लम कालवश
Peanut butter : पीनट बटरचे आरोग्यासाठी अनेक लाभ…

Latest Marathi News भयंकर | बटर चिकन ठरले जीवघेणे, पहिल्या घासात युवकाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.