सुधा मूर्तींची राज्यसभेवर नियुक्ती; पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका सुधा मुर्ती यांची आज (दि.८) राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्या राष्ट्रपती नियुक्त सदस्या म्हणून राज्यसभेवर जात आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. या संदर्भातील माहिती स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून दिली आहे. … The post सुधा मूर्तींची राज्यसभेवर नियुक्ती; पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा appeared first on पुढारी.

सुधा मूर्तींची राज्यसभेवर नियुक्ती; पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका सुधा मुर्ती यांची आज (दि.८) राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्या राष्ट्रपती नियुक्त सदस्या म्हणून राज्यसभेवर जात आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. या संदर्भातील माहिती स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून दिली आहे. (Sudha Murthy Appointed)
सुधा मूर्ती ‘नारी शक्ती’चा एक शक्तिशाली पुरावा- PM मोदी
पीएम मोदींनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारताच्या राष्ट्रपतींनी इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांचे नामांकन केल्याने मला आनंद होत आहे. राज्यसभेत सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान प्रचंड आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती ही आमच्या ‘नारी शक्ती’चा एक शक्तिशाली पुरावा आहे. जी आपल्या देशाचे भवितव्य घडवण्यात तसेच महिलांच्या सामर्थ्याचे उदाहरण आहे. त्यांना फलदायी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छादेखील पीएम मोदींनी दिल्या आहेत. (Sudha Murthy Appointed)
‘या’ सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित
इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती या मूर्ती ट्रस्टच्या अध्यक्ष म्हणून काम करतात. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. वयाच्या ७३ व्या वर्षी, आंतरराष्ट्रीय महिला दिनादिवशीच त्यांचे राज्यसभेवर नामांकन  होत आहे. त्यांना 2006 मध्ये पद्मश्री आणि 2023 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  (Sudha Murthy Appointed)

I am delighted that the President of India has nominated @SmtSudhaMurty Ji to the Rajya Sabha. Sudha Ji’s contributions to diverse fields including social work, philanthropy and education have been immense and inspiring. Her presence in the Rajya Sabha is a powerful testament to… pic.twitter.com/lL2b0nVZ8F
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2024

सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा होत्या. सोबतच त्या प्रसिद्ध लेखिकाही आहेत. सुधा या महिला आणि मुलांसाठी सतत काम करत आहेत. त्यांनी अनेक प्रेरणादायी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. वास्तविक, 1981 मध्ये इन्फोसिसच्या लॉन्चिंगवेळी सुधा मूर्ती यांनी स्वतः त्यांचे पती नारायण मूर्ती यांना 10,000 रुपये दिले होते.  त्यावेळी ते आणि त्यांचे कुटुंबीय भाड्याच्या घरात राहत होते;  असेही सुधा यांनी टीव्ही शोमधील एका मुलाखती दरम्यान सांगितले होते.
हे ही वाचा:

सुधा मूर्ती यांचा ‘FIDE वर्ल्ड कप’वर चाहत्‍यांना सल्ला, ‘मुलाला टेन्शन देवू नका’

Karnataka Assembly Elections : तरुणांनो मतदान करा; सुधा मूर्ती यांचे आवाहन

पुणेकरांचं खोचक पण थेट बोलणे भावते….! : सुधा मूर्ती

 
The post सुधा मूर्तींची राज्यसभेवर नियुक्ती; पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा appeared first on Bharat Live News Media.

Go to Source