महाशिवरात्रीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत १४ मुलांना विजेचा धक्का

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधील कोटा येथे महाशिवरात्रीनिमित्त आज (दि.८) काढलेल्या मिरवणुकीत १४ मुलांना विजेचा धक्का बसला. मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, ऊर्जामंत्री हिरालाल नागर आणि पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. Maha Shivratri 2024 राजस्थानच्या कोटामध्ये … The post महाशिवरात्रीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत १४ मुलांना विजेचा धक्का appeared first on पुढारी.

महाशिवरात्रीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत १४ मुलांना विजेचा धक्का

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधील कोटा येथे महाशिवरात्रीनिमित्त आज (दि.८) काढलेल्या मिरवणुकीत १४ मुलांना विजेचा धक्का बसला. मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, ऊर्जामंत्री हिरालाल नागर आणि पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. Maha Shivratri 2024
राजस्थानच्या कोटामध्ये कुन्हडी थर्मल चौकाजवळून शिव मिरवणूक जात होती. यावेळी विजेचा धक्का लागल्याने १४ मुलांना एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात नेण्यात आलेल्या अनेक मुलांचे हात-पाय भाजलेले आहेत. जखमी मुलांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. Maha Shivratri 2024
या घटनेबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, जखमी मुलांवर तातडीने उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले आहे. एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. बालकांच्या उपचारात कोणतीही कमतरता भासणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना रुग्णालयाला देण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास मुलांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.

#WATCH | Rajasthan: Several children were electrocuted during a procession on the occasion of Mahashivratri, in Kota. Further details awaited. pic.twitter.com/F5srBhO9kz
— ANI (@ANI) March 8, 2024

हेही वाचा 

Maha Shivratri 2024 | शिवपूजना वेळी ‘या’ ५ वस्तूंचा वापर टाळा; उपवासातही टाळावेत ‘हे’ पदार्थ
Maha Shivratri 2024 : महाशिवरात्री विशेष : शंकराला रुद्राभिषेक का प्रिय आहे?
Maha Shivratri 2024: हर हर महादेवाचा गजर महाशिवरात्रीच्या पर्वावर होणार लाखो भाविकांची गर्दी, तिर्थस्थळे फुलली

Latest Marathi News महाशिवरात्रीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत १४ मुलांना विजेचा धक्का Brought to You By : Bharat Live News Media.