आम्‍हालाही ‘ब्रिक्‍स’मध्‍ये घ्‍या : पाकिस्‍तानची याचना; ‘या’ देशांकडून मदतीची अपेक्षा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क: विकसनशील देशांची संघटना असलेल्या ‘ब्रिक्स’च्या वाढत्या लोकप्रियतेच्या भुरळ आता पाकिस्‍तानलाही पडली आहे. ‘आम्‍हालाही ब्रिक्‍स ( BRICS ) संघटनेमध्‍ये समाविष्‍ट करा , अशी याचना करणार अर्ज पाकिस्‍तानने केला आहे. रशियाच्या ‘टास’ या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. रशियामधील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी ब्रिक्समध्ये सदस्यत्व मिळवण्यासाठी रशियाची मदत मागितली आहे. BRICS :  … The post आम्‍हालाही ‘ब्रिक्‍स’मध्‍ये घ्‍या : पाकिस्‍तानची याचना; ‘या’ देशांकडून मदतीची अपेक्षा appeared first on पुढारी.
आम्‍हालाही ‘ब्रिक्‍स’मध्‍ये घ्‍या : पाकिस्‍तानची याचना; ‘या’ देशांकडून मदतीची अपेक्षा


पुढारी ऑनलाईन डेस्‍क: विकसनशील देशांची संघटना असलेल्या ‘ब्रिक्स’च्या वाढत्या लोकप्रियतेच्या भुरळ आता पाकिस्‍तानलाही पडली आहे. ‘आम्‍हालाही ब्रिक्‍स ( BRICS ) संघटनेमध्‍ये समाविष्‍ट करा , अशी याचना करणार अर्ज पाकिस्‍तानने केला आहे. रशियाच्या ‘टास’ या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. रशियामधील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी ब्रिक्समध्ये सदस्यत्व मिळवण्यासाठी रशियाची मदत मागितली आहे.
BRICS :  रशियाकडून मदत मिळण्याची पाकला आशा
‘टास’ने दिलेल्‍या वृत्तानुसार, पाकिस्तानने २०२४ मध्ये ब्रिक्स संघटनेचे सदस्यत्व मिळविण्यासाठी रशियाकडून मदत मिळण्याची आशा व्यक्त केली आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांची मूलभूत रचना असलेल्या BRICS आघाडीने यावर्षी आपल्या सदस्यांची संख्या 11 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा समूहाचे नवीन सदस्य म्हणून समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pakistan has filed an application to join the BRICS group of nations in 2024 and counts on Russia’s assistance during the membership process, the country’s newly appointed Ambassador to Russia Muhammad Khalid Jamali has told TASS in an interview:https://t.co/pQGXDsZ9iD pic.twitter.com/P89WxQggBj
— TASS (@tassagency_en) November 21, 2023

पाकिस्तानकडून अधिकृत माहिती नाही
पाकिस्तानने ब्रिक्समध्‍ये सामील होण्‍याबाबत औपचारिक विनंती केलेली नाही. आम्ही ताज्या घडामोडींचा आढावा घेऊन ब्रिक्ससोबतच्या आमच्या भविष्यातील संबंधांबाबत निर्णय घेऊ, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्याची भावना वाढवण्यासाठी आणि सर्वसमावेशक बहुपक्षीयतेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय मंचांवर आमचे प्रयत्न सुरू ठेवू, असेही त्‍यांनी नमूद केले आहे.
‘ब्रिक्‍स’ संघटना
ब्रिक्‍स हे नाव भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्‍या शिखर संघटनेचे संक्षिप्‍त नाव आहे. सुरुवातीला भारत, ब्राझील, रशिया आणि चीन या चार देशांचे संघटना होती. तेव्‍हा तिला ब्रिक या संक्षिप्‍त नावाने ओळखले जात असे. २०१० मध्‍ये दक्षिण आफ्रिकाचाही या संघटनेत समावेश झाला तेव्‍हापासून संघटनेचे नाव ब्रिक्‍स असे झाले. या वर्षी BRICS आघाडीने यावर्षी आपल्या सदस्यांची संख्या 11 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा समूहाचे नवीन सदस्य म्हणून समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा :

पाकिस्‍तान लष्‍कर हाेतय कमकुवत!,काय आहे कारण?
पाकिस्‍तानमधील कराचीत ‘जैश-ए-मोहम्मद’च्‍या म्होरक्याचा खात्‍मा
चोराच्या उलट्या बोंबा… पाकिस्‍तानने आत्‍मघाती स्‍फोटांचे खापर फोडले भारतावर

 
The post आम्‍हालाही ‘ब्रिक्‍स’मध्‍ये घ्‍या : पाकिस्‍तानची याचना; ‘या’ देशांकडून मदतीची अपेक्षा appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क: विकसनशील देशांची संघटना असलेल्या ‘ब्रिक्स’च्या वाढत्या लोकप्रियतेच्या भुरळ आता पाकिस्‍तानलाही पडली आहे. ‘आम्‍हालाही ब्रिक्‍स ( BRICS ) संघटनेमध्‍ये समाविष्‍ट करा , अशी याचना करणार अर्ज पाकिस्‍तानने केला आहे. रशियाच्या ‘टास’ या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. रशियामधील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी ब्रिक्समध्ये सदस्यत्व मिळवण्यासाठी रशियाची मदत मागितली आहे. BRICS :  …

The post आम्‍हालाही ‘ब्रिक्‍स’मध्‍ये घ्‍या : पाकिस्‍तानची याचना; ‘या’ देशांकडून मदतीची अपेक्षा appeared first on पुढारी.

Go to Source