फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या यादीत सर्वात आधी गडकरी यांचे नाव!
नागपूर ; Bharat Live News Media वृत्तसेवा केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी आमचे मोठे नेते आहेत, पहिल्या यादीत महाराष्ट्राचे नाव नव्हते, जेव्हा महाराष्ट्राची यादी येईल तेव्हा सर्वात आधी नितीन गडकरी यांचे नाव असेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरातील विविध कार्यक्रमासाठी आले असता विमानतळावर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
भाजपच्या पहिल्या 195 उमेदवारांच्या यादीत हेविवेट नेते नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या ऑफर संदर्भात छेडले असता फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे, त्यांनी गडकरींना ऑफर देणे म्हणजे गल्लीतील नेत्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची ऑफर देणे असं आहे. या माध्यमातून उद्धव ठाकरे स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतायत पण त्याचं हसं होत आहे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जेव्हा एखादा मुद्दा उच्च न्यायालयासमोर असतो तेव्हा न्यायालय अशा प्रकारचे निर्देश देत असते. आमच्या वेळी मराठा आरक्षण वैध ठरवलं होतं तेव्हा भरती करताना आमच्या अटींच्या अधीन राहून करा, अशा सूचना केल्या होत्या ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. मी न्यायालयाचा निर्णय ऐकलेला नाही पण माझ्या अनुभवानुसार सांगतो.
दरम्यान, राज्यातील जागावाटपासाठी थोडा वेळ थांबा, आम्ही अधिकृतपणे सांगू , मी खा सुप्रिया सुळे यांना इतकं विचारतो की मावळमध्ये गोळीबार झाला, गोवारी लोकांचा पोलिस लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला, तेव्हा सरकार कोणाचं होतं.? आज सुप्रियाताई विरोधी पक्षात आहे म्हणून ते टीका करतात त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा :
International Women’s Day 2024 | अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक, राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर
Sudha Murty : सुधा मूर्तींची राज्यसभेवर नियुक्ती; पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा
Nashik News : लहानपणापासून ज्याला वडिल म्हणत होती, तो तिचा अपहरणकर्ता निघाला; दहा वर्षांनी झाला उलगडा
Latest Marathi News फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या यादीत सर्वात आधी गडकरी यांचे नाव! Brought to You By : Bharat Live News Media.