मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा : वाबळेवाडीची प्राथमिक शाळा जिल्ह्यात अव्वल

तळेगाव ढमढेरे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाने शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानातील शासकीय गटात जिल्हास्तरावर शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांकाचे 11 लाख रुपयांचे पारितोषिक पटकाविल्याची माहिती मुख्याध्यापिका शरीफा तांबोळी यांनी दिली. वाबळेवाडीतील आंतरराष्ट्रीय शिक्षण देणारी पहिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, असा नावलौकिक मिळविलेल्या या शाळेने गुणवत्ता राखत ’मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात बाजी मारली आहे.
या अभियानात भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला-क्रीडागुणांचा विकास, अशा अनेक निकषांचा अंतर्भाव करण्यात आला होता. हे सर्व निकष पूर्ण करीत शाळेने यश संपादित केले व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे 11 लाख रुपयांचे पारितोषिक पटकाविले. शाळेत गुणवत्ता विकासवाढीसाठी सर्वच परीक्षांमध्ये विक्रमी यश संपादन करीत राज्यभर आपल्या नावाचा डंका निर्माण केला आहे.
शाळेत राज्यातील अनेक शाळा, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समित्या, ग्रामस्थ, अधिकारी व पदाधिकार्यांनी अभ्यास भेटी दिल्या आहेत. तसेच, शैक्षणिक गुणवत्ता कायम राखत विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे शाळेचा यशस्वी प्रवास सुरू आहे. तो कायम राखण्याचा निर्धार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप वाबळे व ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे यांनी व्यक्त केला आहे. शाळेच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, शिक्षण विस्ताराधिकारी वंदना शिंदे, केंद्रप्रमुख प्रकाश लंघे यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
हेही वाचा
Nashik News : लहानपणापासून ज्याला वडिल म्हणत होती, तो तिचा अपहरणकर्ता निघाला; दहा वर्षांनी झाला उलगडा
जागावाटपाबाबत लवकरच निर्णय घेऊ : देवेंद्र फडणवीस
एमआयडीसीशीसंबंधित अधिकारी सोडून पोलिसावर कारवाई!
Latest Marathi News मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा : वाबळेवाडीची प्राथमिक शाळा जिल्ह्यात अव्वल Brought to You By : Bharat Live News Media.
