पाली भाषेचे अभ्यासक डॉ. बालचंद्र खांडेकर यांचे निधन
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पाली विभूषण डॉ. बालचंद्र खांडेकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. पाली भाषेच्या विकासाकरिता त्यांचे योगदान अमूल्य आहे. ते पीडब्ल्यूएस कॉलेज महाविद्यालय कामठी रोड नागपूर येथून पाली प्राकृत विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य म्हणून २००३ साली सेवानिवृत्त झाले. (Dr. Balchandra Khandekar)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली प्राकृत बोर्ड ऑफ स्टडीजचे सलग चार वेळा ते अध्यक्ष राहिलेले आहेत. यूपीएससी मध्ये पाली विषय पुन्हा सुरू करण्यात यावा, पाली विद्यापीठ नागपूर येथे स्थापन करण्यात यावे, महाराष्ट्रात पाली अकादमी स्थापन करण्यात यावी, राज्यघटनेच्या शेड्युल आठ मध्ये पाली भाषेचा समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी ते न्यायालयीन लढाई लढत होते. त्याकरिता त्यांनी ऍड शैलेश नारनवरे यांच्या मदतीने न्यायालयीन लढा सुरू ठेवलेला होता. नागपूर विद्यापीठात बीडला पाली ही मेथड सुरू करण्यासाठी, बीकॉमला पाली हा विषय सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. (Dr. Balchandra Khandekar)
त्यांच्याच प्रयत्नामुळेच नागपूर विद्यापीठात बुद्धिस्ट स्टडीज हा विषय सुरू करण्यात आला. पाली भाषेच्या प्रसाराकरिता जपान, थायलंड, श्रीलंका, म्यानमार आदी बौद्ध देशांना भेटी देऊन बुद्ध विचार पोहोचविण्याचा प्रयत्न केला. अनेक पाली भाषा परिषदांचे त्यांनी आयोजन केलेले आहे. बौद्ध साहित्य संमेलन आयोजित केलेले आहेत. पाली भाषेकरिता सतत मोर्चे आणि आंदोलन निर्माण करून जनमानस जागृत केले.
रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनचे अध्यक्षपदी कार्य करून तरुणांना बौद्ध धम्माच्या वाटेवर घेऊन जाण्याचा सदोदित प्रयत्न केलेला आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये, तसेच सेमिनार मध्ये शोधनिबंध वाचून आपले योगदान दिलेले आहे. अनेक विद्यापीठांच्या बोर्ड ऑफ स्टडीचे ते सदस्य म्हणून कार्यरत राहिलेले आहेत. संस्कृत विद्यापीठ रामटेक यांनी त्यांना पालीविभूषण ही मानद उपाधी देऊन सन्मानित केले आहे.
हेही वाचा
नागपूर : दहा हजार किलो मसाले भाताचा दरवळ!
‘पीएम आवास योजने’मध्ये नागपूर विभाग राज्यात प्रथम : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान
नागपूरमधूनच विधानसभा निवडणूक लढविणार; लोकसभा लढविण्याच्या चर्चेवर फडणवीसांचा पूर्णविराम
The post पाली भाषेचे अभ्यासक डॉ. बालचंद्र खांडेकर यांचे निधन appeared first on पुढारी.
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पाली विभूषण डॉ. बालचंद्र खांडेकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. पाली भाषेच्या विकासाकरिता त्यांचे योगदान अमूल्य आहे. ते पीडब्ल्यूएस कॉलेज महाविद्यालय कामठी रोड नागपूर येथून पाली प्राकृत विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य म्हणून २००३ साली सेवानिवृत्त झाले. (Dr. Balchandra Khandekar) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली प्राकृत बोर्ड ऑफ …
The post पाली भाषेचे अभ्यासक डॉ. बालचंद्र खांडेकर यांचे निधन appeared first on पुढारी.