गेवराईत भगर पिठातून विषबाधा; अनेकांची प्रकृती बिघडली

गेवराई Bharat Live News Media वृत्तसेवा एकादशीच्या दिवशी (गुरूवार) दि.7 मार्च रोजी फराळात भगर पिठाचे पदार्थ खाल्याने शहरातील काही भागात अनेकांची प्रकृती बिघडली. त्यांना विषबाधा झाल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. शहरातील मुख्य भागात असलेल्या शास्त्री चौकातील किराणा दुकानांतून भगर खरेदी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बाधितांना गेवराई येथील सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान महाशिवरात्रीसाठी परळी कडे निघालेले राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे अचानक मध्यरात्री अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात गेले. या ठिकाणी त्यांनी रूग्णांची विचारपूस केली. डॉक्टरांना तात्काळ वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना करून त्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.
प्राथमिक माहितीनुसार, बाधित रूग्ण 3 च्या आसपास आहेत. एकादशी असल्याने भगर पिठाचे पदार्थ खाल्ले. यानंतर त्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी, हात, पाय दुखणे, डोकेदुखी असा त्रास सुरू झाला. यानंतर त्यांना शहरातील सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.
दिवसेंदिवस होत असलेल्या या घटनेमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. भगरीतून विष बाधा होणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणे असाच प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अन्नपुरवठा भेसळ विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेवराई शहरातील सर्व किराणा दुकानाकडे लक्ष घालून होत असलेली विक्री तात्काळ थांबवावी अशी मागणी होत आहे.
हेही वाचा :
LPG cylinder prices | महिला दिनी पीएम मोदींची मोठी घोषणा, LPG सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात
PM Ujjwala Yojana | ‘उज्ज्वला योजने’च्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; LPG सबसिडीला मुदतवाढ
Lok Sabha Election 2024 : भाजप उमेदवारांची यादी माझ्या खिशात!
Latest Marathi News गेवराईत भगर पिठातून विषबाधा; अनेकांची प्रकृती बिघडली Brought to You By : Bharat Live News Media.
