महिला दिनी पीएम मोदींची मोठी घोषणा, LPG सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात

Bharat Live News Media ऑनलाईन : आज महिला दिनी केंद्रातील मोदी सरकारने महिलांसाठी खुशखबर दिली आहे. सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात केली आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करत केली आहे. ”सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमती १०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होईल, विशेषत: याचा आपल्या नारी शक्तीला फायदा होईल.” असे पीएम मोदी यांनी म्हटले आहे. (LPG cylinder prices)
स्वयंपाकाचा गॅस अधिक परवडणारा बनवणे तसेच कुटुंबांच्या कल्याणासाठी आणि आरोग्यदायी वातावरण सुनिश्चित करण्याचेदेखील आमचे ध्येय आहे. हे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्यासाठी ‘जीवन जगणे सोपे होणे’ हे सुनिश्चित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे, असे पीएम मोदी यांनी पुढे नमूद केले आहे.
Today, on Women’s Day, our Government has decided to reduce LPG cylinder prices by Rs. 100. This will significantly ease the financial burden on millions of households across the country, especially benefiting our Nari Shakti.
By making cooking gas more affordable, we also aim…
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2024
The post महिला दिनी पीएम मोदींची मोठी घोषणा, LPG सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात appeared first on Bharat Live News Media.
