Pimpri Crime News : पिस्तूल बाळगणार्या तरुणास अटक
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : अवैध पिस्तूल बाळगणार्या तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सोमवारी (दि. 20) सायंकाळी जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर भक्ती-शक्ती चौकाजवळ ही कारवाई करण्यात आली.
निखिल दिलीप भागवत (30, रा. आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार शुभम कदम यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना पुणे-मुंबई महामार्गावर एकजण संशयितरीत्या थांबला असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली.
त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपी निखिल भागवत याला ताब्यात घेतले. पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे एक लाख रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 हजार रुपयांची चार जिवंत काडतुसे मिळून आली. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा
Pimpri News : वाहनतळाअभावी देहूत बेशिस्त पार्किंग
जळगाव : मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे झोपा काढा आंदोलन
Pune News : कर्णबधिरता चाचणीबाबत प्रशासनाचे कानावर हात
The post Pimpri Crime News : पिस्तूल बाळगणार्या तरुणास अटक appeared first on पुढारी.
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : अवैध पिस्तूल बाळगणार्या तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सोमवारी (दि. 20) सायंकाळी जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर भक्ती-शक्ती चौकाजवळ ही कारवाई करण्यात आली. निखिल दिलीप भागवत (30, रा. आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस …
The post Pimpri Crime News : पिस्तूल बाळगणार्या तरुणास अटक appeared first on पुढारी.