अभियंत्याकडील लाखोंच्या बंडलांची अखेर चौकशी..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या पथ विभागाच्या अभियंत्याकडे सापडलेल्या पाचशे रुपयांच्या लाखांच्या बंडल प्रकरणाची चौकशी करून चोवीस तासांत अहवाल सादर करा, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. पथ विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याच्या टेबल ड्राव्हरमध्ये काही लाखांची रक्कम असल्याचे ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले. या प्रकरणाने पालिकेतील लाचखोरीचा पर्दाफाश झाला. मात्र, या घटनेला 24 … The post अभियंत्याकडील लाखोंच्या बंडलांची अखेर चौकशी.. appeared first on पुढारी.

अभियंत्याकडील लाखोंच्या बंडलांची अखेर चौकशी..

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महापालिकेच्या पथ विभागाच्या अभियंत्याकडे सापडलेल्या पाचशे रुपयांच्या लाखांच्या बंडल प्रकरणाची चौकशी करून चोवीस तासांत अहवाल सादर करा, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. पथ विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याच्या टेबल ड्राव्हरमध्ये काही लाखांची रक्कम असल्याचे ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले. या प्रकरणाने पालिकेतील लाचखोरीचा पर्दाफाश झाला. मात्र, या घटनेला 24 तास उलटूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नव्हती. याबाबत आयुक्त कुमार यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, संबंधित अभियंत्याला नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणाची चौकशी करून चोवीस तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश खातेप्रमुख्यांना देण्यात आले आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
कात्रज बिबट्याप्रकरणी अहवाल
कात्रजमधील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात बिबट्या पिंजर्‍यातून पसार झाल्याच्या घटनेप्रकरणी सेंट्रल झू अ‍ॅथॉरेटीने अहवाल मागविला आहे. त्यात बिबट्या नक्की कसा पळाला आणि त्याला पकडण्यासाठी एवढा कालावधी का लागला, आदींचा बाबींचा खुलासा मागविण्यात आला असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
हेही वाचा

Lokasabha Election : पुण्यातील राजकीय वातावरण तापले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौर्‍यावर
मी शरद पवार आहे, माझा नाद करू नका : शरद पवारांचा आ. शेळकेंना दम

Latest Marathi News अभियंत्याकडील लाखोंच्या बंडलांची अखेर चौकशी.. Brought to You By : Bharat Live News Media.