कोल्हापूर : सरवडे येथे स्लँब कोसळल्याने १२ लाखांचे नुकसान; सुदैवाने जिवीतहानी टळली

सरवडे; Bharat Live News Mediaव्रुत्तसेवा : सरवडे येथील पाणवठा गल्ली गोठन विभागात असलेल्या सातापा सदाशिव जरग यांच्या जनावरांच्या गोठ्याचा संपूर्ण स्लॅब आज दुपारी अचानक कोसळला. यामध्ये गोठ्यात असलेली महिला व दोन जनावरे जखमी झाली. हा स्लॅब एका पिलरवर थांबल्याने जखमी महिला व सात जनावरांना बाहेर काढता आले. या घटनेत सुदैवाने जिवित हानी झाली नाही मात्र गोठ्याचे सुमारे बारा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील सातापा शिवाजी जरग यांचा गोठण विभागात जनावरांचा गोठा आहे. सध्या त्यांच्या गोठ्यात सात जनावरे होती. त्यांची पत्नी कविता जरग जनावरांना वैरण घालण्यासाठी गेली होती. दुपारच्या सुमारास अचानकपणे गोठ्यावर असलेला स्लॅब खाली कोसळला. हा स्लॅब एका पिलरवर टेकल्याने खाली असणाऱ्या जनावरांना धोका झाला नाही. तरी देखील त्यामध्ये असणारी महिला व दोन जनावरे जखमी झाली. आवाज ऐकून लोक जमा झाले. लोकांनी तात्काळ जनावरे व जखमी महिलेला बाहेर काढले व जखमी महिलेला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मोठ्या गोठ्याच्या स्लॅब कोसळल्याने त्यामध्ये शेतकरी जरग यांचे सुमारे बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी तलाठी जीवन कोळी यांनी भेट देऊन वरिष्ठांना माहिती दिली.
Latest Marathi News कोल्हापूर : सरवडे येथे स्लँब कोसळल्याने १२ लाखांचे नुकसान; सुदैवाने जिवीतहानी टळली Brought to You By : Bharat Live News Media.
