महाप्रसाद द्यायचाय? मग आता ‘एफडीए’ची परवानगी घ्या, अन्यथा होईल कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जयंती, उत्सवानिमित्त महाप्रसाद, भंडाऱ्यांचे आयोजन केले जात असून, यातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. यासर्व घटनांची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासननाने महाप्रसादाच्या आयोजनासाठी आॅनलाइन परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी नियमावली देखील जाहीर केली असून, विनापरवानगी महाप्रसादाचे आयोजन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त ठिकाणी महाप्रसादांचे … The post महाप्रसाद द्यायचाय? मग आता ‘एफडीए’ची परवानगी घ्या, अन्यथा होईल कारवाई appeared first on पुढारी.
महाप्रसाद द्यायचाय? मग आता ‘एफडीए’ची परवानगी घ्या, अन्यथा होईल कारवाई

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- जयंती, उत्सवानिमित्त महाप्रसाद, भंडाऱ्यांचे आयोजन केले जात असून, यातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. यासर्व घटनांची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासननाने महाप्रसादाच्या आयोजनासाठी आॅनलाइन परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी नियमावली देखील जाहीर केली असून, विनापरवानगी महाप्रसादाचे आयोजन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
महाशिवरात्रीनिमित्त ठिकाणी महाप्रसादांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, आयोजकांना आॅनलाइन पद्धतीने परवानगी घेणे बंधनकारक आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये महाप्रसादातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आता परवानगी घेणे बंधनकारक आहे. यासाठी नियमावली जाहीर केली असून, त्यातील सर्व सूचनांचे पालन करणे आयोजकांना बंधनकारक असणार आहे. तसेच प्रशासनाकडून तपासणीसाठी प्रशासनाची पथके देखील तयार करण्यात आली आहेत. नियमांचे पालन न केल्यास अन्न, सुरक्षा व मानके कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.
अशा आहेत सूचना
– वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करा.
– शुद्ध पाण्याचा वापर.
– कच्चे अन्नपदार्थ नोंदणीकृत परवानाधारकांकडूनच खरेदी करा.
– महाप्रसाद बनवताना योग्य ती खबरदारी घ्या.
– कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्या.

महाप्रसाद, भंडारा, अन्नदान करताना अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याची बाब २०११ साली आलेल्या अन्न, सुरक्षा व मानके कायद्यात अगोदरपासूनच नमुद केलेली आहे. मोठ्या यात्रा, दिंड्यांमध्ये अन्नदान करताना अनेकजण त्याबाबतची परवानगी देखील घेतात. मात्र, अजूनही बरेच लोक याविषयी अन्नभिन्न असल्याने, त्यांच्यात कायद्याची जनजागृती व्हावी या हेतूनेे प्रशासनाकडून आॅनलाइन परवानगीवर भर दिला जात आहे. – संजय नारगुडे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन

7th Pay Commission | होळी आधी पीएम मोदींचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट! महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ
Lok Sabha polls 2024 : तुमचा ‘कौल’ कोणाला? : ओपोनियन पोलसाठी काेणते घटक ठरतात महत्त्‍वपूर्ण?

Latest Marathi News महाप्रसाद द्यायचाय? मग आता ‘एफडीए’ची परवानगी घ्या, अन्यथा होईल कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.