रावडी सत्या आणि भित्री कॉन्स्टेबल मंजूची नवी मालिका

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका प्रसिद्ध राजकारण्याचा बिनधास्त, निडर कार्यकारी तर एक भित्री भागुबाई पोलिस यांच्या प्रेमाचं, लग्नाचं गणित जुळणारी नवी मालिका ‘कॉन्स्टेबल मंजू’ ( constable manju ) लवकरच येत आहे. ‘कॉन्स्टेबल मंजू’ ही नवीन मालिका १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. संबंधित बातम्या  Alibaba Ani Chalishitale Chor : ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ चा टिझर … The post रावडी सत्या आणि भित्री कॉन्स्टेबल मंजूची नवी मालिका appeared first on पुढारी.

रावडी सत्या आणि भित्री कॉन्स्टेबल मंजूची नवी मालिका

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : एका प्रसिद्ध राजकारण्याचा बिनधास्त, निडर कार्यकारी तर एक भित्री भागुबाई पोलिस यांच्या प्रेमाचं, लग्नाचं गणित जुळणारी नवी मालिका ‘कॉन्स्टेबल मंजू’ ( constable manju ) लवकरच येत आहे. ‘कॉन्स्टेबल मंजू’ ही नवीन मालिका १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
संबंधित बातम्या 

Alibaba Ani Chalishitale Chor : ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ चा टिझर रिलीज
Rakul Preet- Jackky : रकुल जॅकी भगनानी गुवाहाटीत; कामाख्या मंदिरातून फोटो व्हायरल
Ajay Devgn Maidaan Trailer : दमदार स्टाईलमध्ये आला अजय देवगनच्या ‘मैदान’चा ट्रेलर

‘कॉन्स्टेबल मंजू’ ( constable manju ) ही मालिका मंजिरी वाघमारे उर्फ मंजू आणि सत्या या दोन पात्रांवर आधारित आहे. नुकतीच या मालिकेची झलक रिलीज झाली आणि मंजुचा स्वभाव सर्वांना समजला असेल. मंजिरी वाघमारे उर्फ मंजू ही तिच्या ‘वाघमारे’ या आडनावाप्रमाणे बिलकुल धाडसी नाही. मंजू ही भित्री जी जवळजवळ प्रत्येकाला आणि प्रत्येक गोष्टीला घाबरत असणारी दाखविलेली आहे. कोणीही मोठ्याने बोलताना ऐकल्यावर सुद्धा ती घाबरते आणि त्यामुळे तिच्याकडून चुका होतात.
पोलिस या पदाला शोभेल अशी धीट कामं करण्यापेक्षा ती स्टेपलर पिन टाकणे, फाईल्स लावणे, कागदपत्रे भरणे, ज्येष्ठांसाठी बाटलीत पाणी भरणे, देवाची पूजा करणे ही क्षुल्लक कामे पोलीस स्टेशनमध्ये एका दिवसात पार पाडत असते. पोलिस होण्याचा एकही गुण तिच्यात नाही. उलट, कोणताही गुन्हा घडूच नये, अशी ती देवाकडे प्रार्थना करते. खरंतर तिला पोलीस बनण्यात अजिबात रस नव्हता. पण परिस्थिती अशी होती की, तिला नाईलाजास्तव पोलीस दलात भरती व्हावे लागले.

‘शी इज गुड फॉर नथिंग’ हेच तिला नेहमी घरात आणि पोलीस स्टेशनमध्ये बोलले जाते. त्यामुळे, मंजुला ही ती निरुपयोगी आहे असे वाटू लागले. पण आत्मविश्वास गमावलेल्या मंजूच्या आयुष्यात अचानक हिरोची म्हणजेच सत्याची एन्ट्री होते. एका प्रसिद्ध राजकारण्यासाठी काम करणारा सत्या, स्वभावाने अगदी रावडी, तो बोलण्यापूर्वी त्याचे हात पाय आधी बोलतात. पण मनाने तितकाच सच्चा.
राजकारणावर इतका जीव की तो बेकायदेशीर कृत्य करतोय याची त्याला कल्पनाच नसते. सत्याला त्याच्या सारखीच धाडसी पत्नी हवी आहे. त्याच्या लग्न मंडपातच, पोलिस एका वॉन्टेड गुन्हेगाराचा शोध घ्यायला पोहचतात. पोलिसांनी पूर्ण प्लॅन करून ठेवलेला असतो, प्लॅननुसार कोणत्याही कामात रस नसलेल्या मंजूला नववधूच्या रूपात उभे केले जाते आणि जोपर्यंत गुन्हेगार पकडला जात नाही तोपर्यंत तिने वधूच्या ठिकाणाहून हलायचं नाही असा कडक आदेश तिला दिला जातो. पण कट रचला जात असताना, मंजूच्या लग्नाची गाठ सत्यासोबत बांधली जाते.

आता भित्री मंजू आणि निडर सत्या लग्नाच्या बंधनात सामान्य वैवाहिक आयुष्य जगतील का?, दोघांचं एकमेकांसोबत जमेल का?, सत्याच्या सहवासात राहून मंजूच्या स्वभावात बदल घडून ती धाडसी होईल का?, आत्मविश्वास गमावलेली मंजू या नव्या नात्यामुळे स्वतंत्र होऊन स्वतःची ओळख निर्माण करेल का?, या सर्व प्रश्नांची उत्तरे मालिकेतून उलघडणार आहेत.
संदीप जाधव निर्मित ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेत मोनिका राठी हिने मंजुची आणि वैभव कदम यांनी सत्याची भूमिका साकारली आहे. या मालिकेचे संवाद तेजपाल वाघ यांनी लिहिले असून स्वप्नील गांगुर्डे यांनी कथा, पटकथा लिहिली आहे. भिन्न स्वभावाची ही अनोखी प्रेम कहाणी १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Latest Marathi News रावडी सत्या आणि भित्री कॉन्स्टेबल मंजूची नवी मालिका Brought to You By : Bharat Live News Media.