महिला रूग्णालयातून साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक

जळगाव- शहरातील मोहाडी रोडवरील शासकीय महिला रूग्णाालयाच्या बांधकामाच्या ठिकाणाहून १ लाख २७ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेणाऱ्या ३ संशयित आरोपींना मुद्देमालासह तांबापूर येथून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात माहिती अशी की, जळगाव मोहाडीरोड वर शासकीय महिला रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी बांधकामासाठी लागणारे साहित्य एका खोलीत ठेवण्यात आले होते. २ मार्च … The post महिला रूग्णालयातून साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक appeared first on पुढारी.

महिला रूग्णालयातून साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक

जळगाव- शहरातील मोहाडी रोडवरील शासकीय महिला रूग्णाालयाच्या बांधकामाच्या ठिकाणाहून १ लाख २७ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेणाऱ्या ३ संशयित आरोपींना मुद्देमालासह तांबापूर येथून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
या संदर्भात माहिती अशी की, जळगाव मोहाडीरोड वर शासकीय महिला रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी बांधकामासाठी लागणारे साहित्य एका खोलीत ठेवण्यात आले होते. २ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बांधकामाच्या ठिकाणाहून असलेले खोलीचे कडी कोयंडा तोडून १ लाख २७ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी ठेकेदार आयुष्य मणियार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय माहितीनुसार एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी सदबीरसिंग बलवंतसिंग टाक वय-२१, गुरुजीतसिंग सुजानसिंग बावरी वय-२२, आणि तंजीम नसीम बेग मिर्झा वय-३६ तिघे रा. तांबापुरा, जळगाव येथुन तांबापूर येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील साहित्यांपैकी ९७ हजार रुपये किमतीचे साहित्य तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि रिक्षा जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, सचिन मुंडे, पोलीस नाईक, किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे, किरण पाटील, छगन तायडे, ललित नारखेडे आणि साईनाथ मुंडे यांनी केली आहे.
हेही वाचा :

Yashasvi Jaiswal 1000 Runs : यशस्वी जैस्वालच्या वेगवान 1000 धावा! मोडले विराट कोहलीचे ‘हे’ दोन मोठे विक्रम
Pulkit Samrat-Kriti Kharbanda : पुलकित-क्रितीची लग्नपत्रिका संगीत थीमवर
IND vs ENG 5th Test : धर्मशालेत इंग्लिश संघ गारठला! भारतीय फिरकीसमोर लोटांगण

Latest Marathi News महिला रूग्णालयातून साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.