रकुल जॅकी भगनानी गुवाहाटीत; कामाख्या मंदिरातून फोटो व्हायरल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी ( Rakul Preet- Jackky ) लग्नानंतर पहिल्यांदा कामाख्या देवीचे आणि गुरुद्वारचे दर्शन घेतले आहे. नवविवाहित जोडप्याने गुवाहाटी येथील सुवर्ण मंदिरात भेट देत देवाचा आशीर्वाद घेतला आहे. दर्शनानंतर कपलने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
संबंधित बातम्या
Ajay Devgn Maidaan Trailer : दमदार स्टाईलमध्ये आला अजय देवगनच्या मैदानचा ट्रेलर
Arbaaz Khan : हर्ष गुजरालने थेट लग्नावरून अरबाजची उडवली खिल्ली
Yodha New Song : राशी खन्नाचे योद्धा धील ‘तेरे संग इश्क हुआ’ गाणं भेटीला
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी ( Rakul Preet- Jackky ) दोघांनी लग्नानंतर नवीन आयुष्य सुरूवात केली आहे. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी गोव्यात मोठ्या उत्साहात रकुल आणि जॅकी लग्न बंधनात अडकले. लग्नानंतर आता नव्या जोडप्यानी गुवाहाटी येथील सुवर्ण मंदिरात भेट दिली. दरम्यान कपलने येथील कामाख्या देवीचा पुढील दिर्घआयुष्यासाठी आशीर्वाद घेतला आहे. रकुल आणि जॅकीने त्याच्या-त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर यावेळचे काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोत रकुलच्या कपाळावर गुलालाचा टिळा आणि हातात फुलाचा हार दिसतोय.
या फोटोमध्ये रकुलने ऑरेंज कलरचा सूट परिधान केला आहे. यावेळी रकुलने कपाळावर टिळक- हातात फुलांचा हारासोबत चष्माही दिसत आहे. तर जॅकी भगनानी पिवळ्या रंगाच्या कुर्त्या आणि ब्लॅक जीन्समध्ये हॅडसम दिसला. याशिवाय दुसऱ्या एका फोटोत कपलसोबत त्याच्या कुटुंबातील काही सदस्यही दिसत आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये रकुलने ‘कामाख्या देवी मंदिर… ‘ असे लिहिले आहे. हे दोघांचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
यापूर्वी सुवर्ण मंदिरातील फोटो रकुल आणि जॅकीने शोअर केल होते त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. रकुल आणि जॅकीने २१ फेब्रुवारी २०२४ रोजी गोव्यातील ‘ITC ग्रँड इन’ हॉटेलमध्ये लग्न केले होते. या लग्नात काही मोजकेच नातेवाईक, मित्रमंडळीसह बॉलिवूड स्टार्सना आमंत्रित करण्यात आले होते. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, राज कुंद्रा, वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा, शाहिद कपूर आणि मीरा या स्टार्सनी हजेरी लावली होती. लग्नानंतर दोघांनी मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी दिली होती.
View this post on Instagram
A post shared by Rakul Singh (@rakulpreet)
Latest Marathi News रकुल जॅकी भगनानी गुवाहाटीत; कामाख्या मंदिरातून फोटो व्हायरल Brought to You By : Bharat Live News Media.
