Arbaaz Khan : हर्ष गुजरालने थेट लग्नावरून अरबाजची उडवली खिल्ली

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा घटस्फोट २०१६ मध्ये झाला होता. त्यानंतर सुमारे सात ते आठ वर्षांनंतर या वर्षी वयाच्या ५६ व्या वर्षी मेकअप आर्टिस्ट शुरा खान हिच्याशी लग्न करून अरबाजने सर्वांनाच धक्का दिला आहे. (Arbaaz Khan) इतकेच नाही तर शुरा आणि अरबाज यांच्यामध्ये वयाचा मोठे अंतर आहे. आता थेट एका शोमध्ये ५६ व्या वर्षी लग्न केल्याने अरबाजची खिल्ली उडवण्यात आली आहे. (Arbaaz Khan)
नुकताच अरबाज हा न्यू कॉमेडी शो ‘मेडनेस मचाएंगे : इंडिया को हंसाएंगे’मध्ये पोहोचला. यावेळी हर्ष गुजराल याने थेट अरबाजची दुसऱ्या लग्नावरून खिल्ली उडवली आहे. या शोमध्ये गेस्ट म्हणून अरबाज हा पोहोचला होता. हर्ष गुजराल म्हणाला की, अरबाज भाई माझे वडील तुमचे खूप मोठे चाहते आहेत आणि मला नेहमीच म्हणतात की, अरबाज भाईकडून काहीतरी शिक. मी त्यांना म्हटले मला काय शिकायचे आहे? ते म्हणाले बघ त्यांनी लग्न केले, तू पण कर. मी वडिलांना म्हणालो की, त्यांनी ज्या वयात लग्न केले ते तुम्ही शिकायला पाहिजे. खासगी आयुष्याबाबत खुलेआम खिल्ली उडवूनही अरबाज खान हा चिडला नाही. आता हर्ष गुजरालच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Latest Marathi News Arbaaz Khan : हर्ष गुजरालने थेट लग्नावरून अरबाजची उडवली खिल्ली Brought to You By : Bharat Live News Media.
