धर्मशालेत इंग्लिश संघ गारठला! भारतीय फिरकीसमोर लोटांगण

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना आजपासून धर्मशाला येथे सुरू आहे. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव 218 धावांवर संपुष्टात आला. फलंदाजी करताना इंग्लंकडून झॅक क्रॉलीने सर्वाधिक 79 धावांची खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला 30 धावांचा आकडा गाठता आला नाही. भारताकडून कुलदीप यादवने पाच विकेट घेतल्या. त्याच वेळी, रविचंद्रन अश्विनने 100 वी कसोटी सामन्यात चार विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. म्हणजे इंग्लंडच्या सर्व 10 विकेट फिरकीपटूंनी घेतल्या. (India vs England 5th Test)
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली केली होती. बेन डकेट आणि जॅक क्रोली यांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. कुलदीपने ही भागीदारी तोडली. त्याने डकेटला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. डकेट 27 धावा करू शकला. यानंतर क्रॉलीने कसोटी कारकिर्दीतील 14वे अर्धशतक आणि भारताविरुद्ध पाचवे अर्धशतक पूर्ण केले. उपाहारापूर्वी कुलदीपने ऑली पोपला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकडून यष्टिचित करून इंग्लिश संघाला आणखी एक धक्का दिला. पोप 11 धावा करू शकला. पहिल्या सत्रात 25.3 षटकांमध्ये इंग्लंडने दोन विकेट गमावून 100 धावा केल्या. (India vs England 5th Test)
यानंतर दुसऱ्या सत्रात इंग्लंडने 29.3 षटकात 6 गडी गमावून 94 धावा केल्या. एके काळी इंग्लंडची धावसंख्या ३८व्या षटकात दोन गडी बाद १३७ धावा होती. यानंतर क्रॉलीची विकेट पडली आणि इथून इंग्लंडचा संपूर्ण डाव गडगडला. 137 धावांवर दोन गडी बाद असा स्कोअर असताना इंग्लंडचा संघ 58 व्या षटकात 218 धावांवर गारद झाला.
Innings Break!
Outstanding bowling display from #TeamIndia! 👌 👌
5⃣ wickets for Kuldeep Yadav
4⃣ wickets for R Ashwin
1⃣ wicket for Ravindra Jadeja
Scorecard ▶️ https://t.co/jnMticF6fc #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/hWRYV4jVRR
— BCCI (@BCCI) March 7, 2024
हेही वाचा :
Maha Shivratri 2024 | शिवपूजना वेळी ‘या’ ५ वस्तूंचा वापर टाळा; उपवासातही टाळावेत ‘हे’ पदार्थ
Kuldeep Yadav : कुलदीपने घेतली इंग्लंडची ‘फिरकी’; निम्मा संघ धाडला तंबूत
Surbhi Chandna : सुरभि चंदनाने अचानक केलं लग्न, आता फोटो आले समोर
Latest Marathi News धर्मशालेत इंग्लिश संघ गारठला! भारतीय फिरकीसमोर लोटांगण Brought to You By : Bharat Live News Media.
