एसटी महामंडळाची अयोध्या दर्शन यात्रा : प्रायोगिक तत्त्वावर निर्णय

नगर : पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागाने नगर ते अयोध्या (तीन ज्योतिर्लिंग) दर्शन यात्रा बस प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या यात्रेसाठी प्रतिव्यक्ती 7 हजार रुपये प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. 16 मार्च रोजी हिरकणी सेमी लक्झरी बस अयोध्याच्या दिशेने धावणार आहे. प्रवाशांची मागणी वाढल्यास दर शनिवारी बस सोडण्यात येणार आहे. पंतप्रधान … The post एसटी महामंडळाची अयोध्या दर्शन यात्रा : प्रायोगिक तत्त्वावर निर्णय appeared first on पुढारी.

एसटी महामंडळाची अयोध्या दर्शन यात्रा : प्रायोगिक तत्त्वावर निर्णय

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागाने नगर ते अयोध्या (तीन ज्योतिर्लिंग) दर्शन यात्रा बस प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या यात्रेसाठी प्रतिव्यक्ती 7 हजार रुपये प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. 16 मार्च रोजी हिरकणी सेमी लक्झरी बस अयोध्याच्या दिशेने धावणार आहे. प्रवाशांची मागणी वाढल्यास दर शनिवारी बस सोडण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. तेव्हापासून रामलल्लाचे दर्शन घेण्याची आस जनतेला लागली आहे. नगर जिल्ह्यातील जनतेसाठी एसटी महामंडळाच्या वतीने अयोध्या दर्शन यात्रा बस सुरू केली. अहमदनगर येथून सकाळी 11 वाजता बस सुटणार आहे.
ही बस काशी विश्वेश्वर, प्रयागराज, श्री महाकालेश्वर (उज्जैन) व ओेंकारेश्वरला देखील जाणार आहे. या सहा दिवसांच्या यात्रेसाठी प्रतिव्यक्ती 7 हजार रुपये फक्त प्रवासभाडे असणार आहे. निवास, जेवण आणि चहापाणी यांचा खर्च प्रवाशांनी स्वत: करावयाचा आहे. या हिरकरणी बससाठी दोन चालक असणार आहेत. याशिवाय प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी एक कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे.
एखाद्या गावातून 44 प्रवासी उपलब्ध झाल्यास त्याच गावातून अयोध्यादर्शन यात्रा बस उपलब्ध केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी तारकपूर आगार येथील अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
सहा दिवसांत तीन मुक्काम
ही बस नागपूरमार्गे (समृद्धी महामार्गाने) अयोध्या येथे पोहोचणार असून, तेथे पहिला मुक्काम असणार आहे. त्यानंतर अयोध्या, वाराणसी येथे मुक्काम. गंगा आरती दर्शन होणार आहे. त्यानंतर प्रयागराज त्रिवेणी संगम येथे वणीदान विधी करुन उज्जैन, महाकालेश्वर भैरवनाथ दर्शन होणार आहे. त्यानंतर ओकारेश्वर, ममलेश्वर येथे मुक्काम करून परत अहमदनगरकडे बस रवाना होणार आहे. गुरुवारी रात्री दहा वाजता बस अहमदनगर येथे पोहोचणार आहे.
हेही वाचा

Nashik News : विधी संघर्षित मुलाने साडेतीन वर्षीय बालकाला सांडपाण्यात फेकले, नाका-तोंडात पाणी गेल्याने मृत्यू
राष्ट्रवादीच्या बैठकीला आमदारांची दांडी : पदाधिकार्‍यांत जुंपल्याने गुंडाळली बैठक
भंडारदरा, निळवंडे धरणांसह 12 जलसाठ्यांचे पोट खपाटीला !

Latest Marathi News एसटी महामंडळाची अयोध्या दर्शन यात्रा : प्रायोगिक तत्त्वावर निर्णय Brought to You By : Bharat Live News Media.