PM मोदींना ‘काश्मीर’ची भूरळ, श्रीनगर विमानतळावर पोहोचताच केले ‘फोटोशूट’

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पीएम मोदी प्रथमच श्रीनगरच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांचे विमान विमानतळावर लँड होताच त्यांनी श्रीनगरमधील खास ठिकाणी आज (दि.७) फोटोशूट केले. पीएम नरेंद्र मोदी यांनी त्यांचे हटके फोटो एक्स अकाऊंटवरून शेअर केले आहेत. (PM Modi Kashmir Visit) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत. … The post PM मोदींना ‘काश्मीर’ची भूरळ, श्रीनगर विमानतळावर पोहोचताच केले ‘फोटोशूट’ appeared first on पुढारी.
PM मोदींना ‘काश्मीर’ची भूरळ, श्रीनगर विमानतळावर पोहोचताच केले ‘फोटोशूट’


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पीएम मोदी प्रथमच श्रीनगरच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांचे विमान विमानतळावर लँड होताच त्यांनी श्रीनगरमधील खास ठिकाणी आज (दि.७) फोटोशूट केले. पीएम नरेंद्र मोदी यांनी त्यांचे हटके फोटो एक्स अकाऊंटवरून शेअर केले आहेत. (PM Modi Kashmir Visit)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “थोड्या वेळापूर्वी श्रीनगरला पोहोचल्यावर दुरूनच भव्य शंकराचार्य टेकडी पाहण्याची संधी मिळाली”, असे स्पष्ट केले. या फोटोत पीएम मोदींनी शंकराचार्य टेकडी हाताच्या बोटाने दर्शवत नमस्कारदेखील केला आहे. (PM Modi Kashmir Visit)
पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगरच्या दौ-यावर आहेत. दरम्यान, ते श्रीनगर येथील बक्षी स्टेडियमवरील ‘विकसित भारत, विकसित जम्मू काश्मीर’ कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांनी यावेळी जम्मू काश्मीरमधील कृषी आणि पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध ६,४०० कोटींच्या ५३ प्रकल्पांचे लोकार्पण केले. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी #श्रीनगरमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील स्थानिक उत्पादनांच्या  प्रदर्शनाला भेट दिली. (PM Modi Kashmir Visit)

Upon reaching Srinagar a short while ago, had the opportunity to see the majestic Shankaracharya Hill from a distance. pic.twitter.com/9kEdq5OgjX
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2024

शंकराचार्य टेकडीच्या माथ्यावर भगवान शंकराचे मंदिर
श्रीनगरमधील जबरवान पर्वतरांगेवर शंकराचार्य टेकडीच्या शिखरावर शंकराचार्य मंदिर आहे. हे मंदिर हिंदू देव शिवाला समर्पित आहे. या मंदिराला आदि शंकराचार्यांनी भेट दिली होती आणि तेव्हापासून हे मंदिर त्यांच्याशी निगडीत आहे असे काश्मिरी हिंदूंचे ठाम मत आहे. या अख्याईकेवरून मंदिर आणि टेकडीला शंकराचार्य असे नाव पडले. काश्मिरी पंडितांची या मंदिरावर नितांत श्रद्धा आहे. काश्मीरमध्ये हेरथ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिवरात्रीच्या सणाला येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
हेही वाचा:

भाजपचे 185, तर काँग्रेसचे 130 जागांवर मंथन; भाजपची उद्या बैठक
Lok Sabha polls 2024 : ओडिशात भाजपला मिळणार ‘भक्‍कम’ मित्र!, नवीन पटनायक ‘NDA’च्‍या वाटेवर?
Gold Rate Today | सोने दराचा नवा उच्चांक, आठवडाभरात २,७०० रुपयांनी महागले

The post PM मोदींना ‘काश्मीर’ची भूरळ, श्रीनगर विमानतळावर पोहोचताच केले ‘फोटोशूट’ appeared first on Bharat Live News Media.

Go to Source