बांधकाम कामगारांनी योजनांचा लाभ घ्यावा : आ. लहू कानडे

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. लहू कानडे यांनी केले. आ. कानडे यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्यावतीने नोंदणीकृत 55 बांधकाम कामगारांना गृहोपयोगी 30 भांड्यांच्या संचाचे वितरण करण्यात आले. यावेळी आ. कानडे बोलत होते. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचीन गुजर, … The post बांधकाम कामगारांनी योजनांचा लाभ घ्यावा : आ. लहू कानडे appeared first on पुढारी.

बांधकाम कामगारांनी योजनांचा लाभ घ्यावा : आ. लहू कानडे

श्रीरामपूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. लहू कानडे यांनी केले. आ. कानडे यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्यावतीने नोंदणीकृत 55 बांधकाम कामगारांना गृहोपयोगी 30 भांड्यांच्या संचाचे वितरण करण्यात आले. यावेळी आ. कानडे बोलत होते. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचीन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, माजी नगरसेवक अशोक कानडे, असंघटित कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष इमरान शेख यावेळी उपस्थित होते.
आ. कानडे म्हणाले, शासनाने बांधकाम कामगारांसाठी इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ स्थापन केले. यामार्फत बांधकाम कामगारांसाठी योजना राबविल्या जातात. यापूर्वी कामगारांना बांधकाम साहित्य वितरण केले. आता 30 भांड्यांचा संच वितरित करण्यात आला. मेळावा घेऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन, कामगारांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करु. यावेळी असंघटित कामगार संघटनेचे उपाध्यक्ष संतोष निकम, सरचिटणीस जमीर शेख, हसन शाह व अमोल आदिक, अजिंक्य उंडे, हरिभाऊ बनसोडे, अन्वर शाह, अखिल शेख, अनिल पालवे, अनिल दळवी, बशीर शाह, युसुफ शेख, अमित शेख, संजय सूर्यवंशी, कुणाल शरणागत, रंजना शेळके, आरती पांडागळे, शाहरुख बागवान, गणेश अस्वले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा

साकूर पठार भागात पेटले पिण्याचे पाणी : ग्रामस्थांचे सहा दिवसांपासून आमरण उपोषण
ठेकेदाराचा हलगर्जीपणा ठरतोय डोकेदुखी : नगर-जामखेड रस्त्याचे काम रखडले
Tiger Shroff Baaghi 3 : टायगर श्रॉफच्या बागी-३ चित्रपटाची ४ वर्षे पूर्ण

Latest Marathi News बांधकाम कामगारांनी योजनांचा लाभ घ्यावा : आ. लहू कानडे Brought to You By : Bharat Live News Media.