धक्‍कादायक..! महान बुद्धिबळपटू कास्पारोव्ह यांना रशियाने केले दहशतवादी घोषित

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रशियाने महान बुद्धिबळपटू आणि राजकीय कार्यकर्ते गॅरी कास्‍परोव यांच्‍या नावाचा समावेश दहशतवादी यादीत केला आहे. रशियाची आर्थिक देखेरख संस्‍था ‘रोसफिन’ने याची घोषणा केली आहे. दहशतवादी यादीत समावेश असलेल्‍या लोकांशी बॅक व्‍यवहार करण्‍यास प्रतिबंध केला जातो. तसेच या यादीत समावेश असलेल्‍या व्‍यक्‍तींशी आर्थिक व्‍यवहार करताना रशियाच्‍या अर्थ विभागाची परवानागी घेणे आवश्‍यक असते. … The post धक्‍कादायक..! महान बुद्धिबळपटू कास्पारोव्ह यांना रशियाने केले दहशतवादी घोषित appeared first on पुढारी.

धक्‍कादायक..! महान बुद्धिबळपटू कास्पारोव्ह यांना रशियाने केले दहशतवादी घोषित

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : रशियाने महान बुद्धिबळपटू आणि राजकीय कार्यकर्ते गॅरी कास्‍परोव यांच्‍या नावाचा समावेश दहशतवादी यादीत केला आहे. रशियाची आर्थिक देखेरख संस्‍था ‘रोसफिन’ने याची घोषणा केली आहे. दहशतवादी यादीत समावेश असलेल्‍या लोकांशी बॅक व्‍यवहार करण्‍यास प्रतिबंध केला जातो. तसेच या यादीत समावेश असलेल्‍या व्‍यक्‍तींशी आर्थिक व्‍यवहार करताना रशियाच्‍या अर्थ विभागाची परवानागी घेणे आवश्‍यक असते.
६०वर्षीय जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन गॅरी कास्‍परोव हे मागील काही वर्ष रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे आघाडीचे टीकाकार आहेत. युक्रेनमध्ये रशियाच्या लष्करी हल्ल्याचाही त्‍यांनी सातत्याने निषेध केला आहे.
२०१४ मध्‍ये रशियातून पलायन
सरकारच्‍या दडपशाहीमुळे कास्पारोव्ह यांनी २०१४ मध्‍ये रशिया सोडला होता. सध्‍या त्‍यांचे वास्‍तव्‍य अमेरिकेत आहे. ‘परकीय एजंट’ हा शब्द अशा व्यक्तींसाठी वापरला जातो ज्यांना ते राज्याचे शत्रू मानतात. कास्पारोव्ह हा जगातील सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटूंपैकी एक मानला जातो. राजकारणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ते जवळजवळ दशकभर अमेरिकेत वास्तव्यास आहेत.
युक्रेनला दिला होता पाठिंबा
२२ फेब्रुवारी २०२२ मध्‍ये रशियाने युक्रेनवर हल्‍ला केला होता. यावेळी कास्‍पारोव्‍ह यांनी रशियाच्‍या कृतीचा निषेध केलाहोता. रशियामध्ये लोकशाही बदल घडवून आणण्यासाठी युक्रेनने मॉस्कोला पराभूत करण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले होते.
हेही वाचा :
PM Modi Kashmir Visit | कलम ३७० हटवल्यानंतर PM मोदी प्रथमच काश्मीर दौऱ्यावर, ६,४०० कोटींच्या ५३ प्रकल्पांचे लोकार्पण
भाजपचे 185, तर काँग्रेसचे 130 जागांवर मंथन; भाजपची उद्या बैठक
 
Latest Marathi News धक्‍कादायक..! महान बुद्धिबळपटू कास्पारोव्ह यांना रशियाने केले दहशतवादी घोषित Brought to You By : Bharat Live News Media.