पैलवानाने ‘जय महाराष्ट्र’ म्हणताच हातातील माईक घेतला हिसकावून

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे आनंदवाडी आखाड्यात आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात एका पैलवानाने ‘जय महाराष्ट्र’ म्हणताच उद्योजक श्रीकांत देसाई यांनी ‘जय महाराष्ट्र ‘म्हणू नका, असे आवाहन केल्याने एकच खळबळ उडाली. आखाड्यात उपस्थित समिती कार्यकर्त्यांनी देसाई यांना चांगलेच धारेवर धरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बुधवारी (दि.६) … The post पैलवानाने ‘जय महाराष्ट्र’ म्हणताच हातातील माईक घेतला हिसकावून appeared first on पुढारी.
पैलवानाने ‘जय महाराष्ट्र’ म्हणताच हातातील माईक घेतला हिसकावून

बेळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे आनंदवाडी आखाड्यात आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात एका पैलवानाने ‘जय महाराष्ट्र’ म्हणताच उद्योजक श्रीकांत देसाई यांनी ‘जय महाराष्ट्र ‘म्हणू नका, असे आवाहन केल्याने एकच खळबळ उडाली. आखाड्यात उपस्थित समिती कार्यकर्त्यांनी देसाई यांना चांगलेच धारेवर धरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
बुधवारी (दि.६) रात्री आनंदवाडी आखाड्यात नेपाळचा पैलवान देवा थापा याची कुस्ती लावली जात होती. कुस्ती सुरू होण्याआधी देवा थापा याने हातात माईक घेऊन ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करताच उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याचवेळी देवा थापा याने ‘जय महाराष्ट्र’ असे म्हणताच जवळ उपस्थित असलेल्या श्रीकांत देसाई यांनी थापा यांच्या हातातील माईक हिसकावून घेत ‘जय महाराष्ट्र’ म्हणू नका असे सांगितले. यावेळी आखाड्यात उपस्थित असलेल्या समिती कार्यकर्त्यांनी देसाई यांना खडसावून जाब विचारला. यावेळी काही वेळ वादावादी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच समिती नेत्यांनी निषेध व्यक्त केला. कुस्ती ही महाराष्ट्राची परंपरा असून कुस्ती आखाड्यातच महाराष्ट्राचा अवमान झाल्याने मराठी भाषिकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा :

 मनी लाँड्रिंग प्रकरणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मोठा दिलासा
Mangalore Acid attack | मंगळूर जिल्हा हदरला: अ‍ॅसिड हल्ल्यात तीन विद्यार्थिनी जखमी; एकतर्फी प्रेमातून कृत्य
Bengaluru Rameshwaram Cafe | बंगळूरच्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये मोठा स्फोट, ४ जखमी

Latest Marathi News पैलवानाने ‘जय महाराष्ट्र’ म्हणताच हातातील माईक घेतला हिसकावून Brought to You By : Bharat Live News Media.