ओडिशात भाजपला मिळणार ‘भक्‍कम’ मित्र!, नवीन पटनायक ‘NDA’च्‍या वाटेवर?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होणार आहे. यापूर्वी राजकीय पक्षांमधील युती आणि आघाड्यांच्‍या चर्चेला उधाण आले आहे. आता तब्‍बल १५ वर्षानंतर बिजू जनता दलाचे सर्वेसर्वा आणि ओडिशाचे मुख्‍यमंत्री नवीन पटनायक हे पुन्‍हा एकदा राष्‍ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) त सहभागी होतील. ओडिशामध्‍ये लोकसभा निवडणुकीत बिजू जनता दल (बीजेडी) १३ तर भाजपला ८ मतदारसंघात … The post ओडिशात भाजपला मिळणार ‘भक्‍कम’ मित्र!, नवीन पटनायक ‘NDA’च्‍या वाटेवर? appeared first on पुढारी.
ओडिशात भाजपला मिळणार ‘भक्‍कम’ मित्र!, नवीन पटनायक ‘NDA’च्‍या वाटेवर?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होणार आहे. यापूर्वी राजकीय पक्षांमधील युती आणि आघाड्यांच्‍या चर्चेला उधाण आले आहे. आता तब्‍बल १५ वर्षानंतर बिजू जनता दलाचे सर्वेसर्वा आणि ओडिशाचे मुख्‍यमंत्री नवीन पटनायक हे पुन्‍हा एकदा राष्‍ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) त सहभागी होतील. ओडिशामध्‍ये लोकसभा निवडणुकीत बिजू जनता दल (बीजेडी) १३ तर भाजपला ८ मतदारसंघात निवडणूक लढवेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असल्‍याचे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे. ( Lok Sabha polls 2024 : Naveen Patnaik NDA to reunite after 15 years? )
लोकसभा निवडणुकीत बीजेडी १३ जागांवर तर भाजप ८ जागांवर निवडणूक लढविण्‍याचा प्रस्‍ताव असून, याला सहमती मिळू शकते, असे बिजू जनता दलाच्‍या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, भाजपला लोकसभेच्या नऊ तर विधानसभेसाठी 55 जागा हव्या आहेत. सध्या ओडिशात भाजपचे आठ खासदार आणि २३ आमदार आहेत. ( Lok Sabha polls 2024 : Naveen Patnaik NDA to reunite after 15 years? )
Lok Sabha polls 2024 :  युतीबाबत दोन्‍ही पक्षांनी घेतल्‍या स्‍वतंत्र बैठका
भुवनेश्वरमधील नवीन पटनायक यांच्या निवासस्थानी बीजेडी नेत्यांची बैठक झाली. तर ओडिशाच्या भाजप नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे प्रमुख जेपी नड्डा यांच्यासोबत नवी दिल्लीत बैठक घेतली या दोन्‍ही बैठकांमध्‍ये युतीबाबत चर्चा केल्‍याचे समजते. बीजेडीच्या बैठकीनंतर, पक्षाचे उपाध्यक्ष आणि आमदार देबीप्रसाद मिश्रा यांनी भाजपसोबत संभाव्य युतीबाबत चर्चा झाल्‍याचे सांगितले. नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखाली राज्याने लक्षणीय प्रगती केली आहे. ओडिशातील लोकांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल, असेही त्‍यांनी नमूद केले.
देबी मिश्रा आणि बीजेडीचे वरिष्ठ सरचिटणीस अरुण कुमार साहू यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, बैठकीत “आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत वरिष्ठ नेत्यांशी विस्तृत चर्चा झाली. तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार जुआल ओरम यांनी स्‍पष्‍ट केले की, युतीबाबत अंतिम निर्णय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून घेतला जाईल. ( Lok Sabha polls 2024 : Naveen Patnaik NDA to reunite after 15 years? )
ओडिशात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र
लोकसभा निवडणुकाबरोबच ओडिशातील विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. भाजप आणि बीजेडी पुन्हा हातमिळवणी करतील, या चर्चेला उधाण आले आहे. २०१९ च्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपने आठ मतदारसंघात तर विधानसभेच्‍या 23 जागा जिंकल्या होत्‍या. तर बिजू जनता दलाने १२ लोकसभा मतदारसंघ तर 112 विधानसभा मतदाससंघात विजय मिळवला होता. दरम्‍यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवीन पटनाईक यांनी एकमेकांचे जाहीरपणे कौतुक केले आहे. त्‍यामुळे दोन्‍ही पक्ष पुन्‍हा एकदा युती करतील, अशा चर्चेला ओडिशातील राजकीय वतुर्ळात उधाण आले आहे.
हेही वाचा :

Lok Sabha Election 2024 : भाजप १८५ जागांवर तर काँग्रेस १३० जागांवर मंथन करणार
Lok Sabha Election : लोकसभेसाठी भाजपचे घोषवाक्य ठरलं!; ‘तिसरी बार मोदी सरकार’, अबकी बार 400 पार’

 
Latest Marathi News ओडिशात भाजपला मिळणार ‘भक्‍कम’ मित्र!, नवीन पटनायक ‘NDA’च्‍या वाटेवर? Brought to You By : Bharat Live News Media.