
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मानवी संवेदनांचा कानाकोपरा शोधत क्रौर्याचे तत्वज्ञान कसे आणि कुठून येते याचा मर्मभेदी शोध किमिदिन या चित्रपटातून घेतला जाणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नीलेश नवलाखा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा एक क्राईम थ्रिलर चित्रपट असून त्यामध्ये तगडी स्टारकास्ट दिसणार आहेत.
माधवी नवलाखा निर्मित किमिदिन या चित्रपटाचं लेखन संजय सोनवणी यांनी केलं आहे. संजय सोनवणी नामवंत साहित्यिक आणि अभ्यासक आहेत. ‘शाळा’, ‘अनुमती’ आणि ‘फँड्री’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निर्मिती नीलेश नवलाखा यांनी केली आहे.
या चित्रपटात मिलिंद शिंदे, राज साने, मानिनी दुर्गे, जयेश संघवी, प्रमोद काळे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. तर साई-पियुष संगीत दिग्दर्शन, दर्शन ढावरे छायांकन, अविनाश सोनवणे ध्वनीसंयोजन करत आहेत.
२१ खून केलेल्या सिरीयल किलर आरोपीच्या चौकशीसाठी एक पोलीस अधिकारी गेल्यावर तिथं चौकशी दरम्यान भावना आणि क्रौर्य याचे भयंकर मानवी-अतिमानवी नाट्य सुरू होतं, या आशय सूत्रावर किमिदिन हा चित्रपट आधारित आहे.
Latest Marathi News २१ खून केलेल्या सिरीयल किलरची कहाणी ‘किमिदिन’मधून Brought to You By : Bharat Live News Media.
