उजनी धरणात आढळला समुद्र ढोकरी!

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा : भारताच्या समुद्र किनारपट्टीवर नेहमी वावर असणारा समुद्री ढोकरी पक्षी उजनी (यशवंत सागर) जलाशयात पक्षिअभ्यासकांना नुकताच आढळून आला. महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनार्‍यावरील खडकाळ भागात आढळणार्‍या बगळ्यांच्या प्रकारातील हा आगळावेगळा पक्षी आढळून आल्यामुळे पक्षिप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे. पक्षिनिरीक्षक स्वप्निल भोसकर यांनी या बगळ्यांची नोंद केली आहे. समुद्रीतटावरील खडकाळ प्रदेशातील खेकडे, शिंपले व … The post उजनी धरणात आढळला समुद्र ढोकरी! appeared first on पुढारी.

उजनी धरणात आढळला समुद्र ढोकरी!

पळसदेव : Bharat Live News Media वृत्तसेवा : भारताच्या समुद्र किनारपट्टीवर नेहमी वावर असणारा समुद्री ढोकरी पक्षी उजनी (यशवंत सागर) जलाशयात पक्षिअभ्यासकांना नुकताच आढळून आला. महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनार्‍यावरील खडकाळ भागात आढळणार्‍या बगळ्यांच्या प्रकारातील हा आगळावेगळा पक्षी आढळून आल्यामुळे पक्षिप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे. पक्षिनिरीक्षक स्वप्निल भोसकर यांनी या बगळ्यांची नोंद केली आहे. समुद्रीतटावरील खडकाळ प्रदेशातील खेकडे, शिंपले व विविध प्रकारच्या मृदुकायी प्राण्यांना टिपत वावरणार्‍या या बगळ्याला कोकणात काळा बगळा, समुद्र ढोकरी, कुकी, कोटी, कोळी व काळी बकी, अशी नावे आहेत.
समुद्रकाठच्या खाड्यांमध्ये व खारफुटीच्या (मँग्रूव्ह) जंगलामध्ये यांचा वावर असल्यामुळे त्यांना इंग्रजीत ‘रीफ हेरॉन (ठशशष हशीेप)’ असे नाव आहे. ओहोटीच्या वेळी उघड्या पडलेल्या खडकांच्या डबक्यातील मासे व अन्य समुद्री जलचरांवर हे पक्षी उदरनिर्वाह करतात. मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवेश द्वाराजवळ, देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मंदिर व विजयदुर्ग परिसरात, मुंबईच्या हाजी अली तसेच महालक्ष्मीच्या खडकावर हे पक्षी पर्यटकांना हमखास नजरेस पडतात.
मराठी साहित्यात अनोखे स्थान
काळ्या बगळ्यांना मराठी साहित्यात अनोखे स्थान मिळाले आहे. पोवाडा व लोकगीतांमधून विरोधाभासाचे मर्म वर्णन सांगताना शाहीर व गीतकारांनी अनेकवेळा या काळ्या बगळ्यांचा उल्लेख केला आहे. पावसाळ्यापूर्वी हे बगळे सागर किनार्‍यावरील खडकाळ प्रदेश सोडून गटागटाने मिठागाराकडे भटकंतीला जातात तेव्हा ‘कोक्या आला मिठावर, पाऊस येईल वेळेवर’ असे म्हणत कोकणातील शेतकरी पावसाळ्याचा अंदाज व्यक्त करतात.
हे बगळे क्वचित प्रसंगी समुद्रापासून दूर असणार्‍या पश्चिम महाराष्ट्रातील पठारी प्रदेशात भटकंती करीत येतात व तेथील जलस्थानांवर लहान, मध्यम व मोठ्या बगळ्यांच्या समूहात त्यांच्याशी सलगी करून वावरताना दिसतात. यापूर्वी 2010 मध्ये जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस गावच्या शिवारातील तलावात काळा बगळा आढळल्याची नोंद झाली आहे. पावसाळ्यापूर्वी हे स्थानिक स्थलांतर करून आलेले बगळे परत समुद्राकडे निघून जातात.
– डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षिअभ्यासक

हेही वाचा

भीमाशंकर यात्रेसाठी प्रशासन सज्ज !
जिल्ह्यात उन्हाळी पिकांच्या 48 टक्केच पेरण्या पूर्ण
भंडारा : चारा-पाण्याअभावी दगावली ३४ जनावरे

Latest Marathi News उजनी धरणात आढळला समुद्र ढोकरी! Brought to You By : Bharat Live News Media.