कस्तुरी क्लब विभागप्रमुखांच्या कलाविष्काराला मिळाली दाद
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : दैनिक Bharat Live News Media कस्तुरी क्लबच्या विभागप्रमुखांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. विभागप्रमुखांच्या वैविध्यपूर्ण कलाविष्काराला दिलखुलास दादही दिली अन् हे निमित्त प्रत्येक कस्तुरीच्या कलागुणांना वाव देणारे ठरले. निमित्त होते जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विभागप्रमुखांच्या कौतुक सोहळ्याचे. Bharat Live News Media कस्तुरी क्लबच्या वतीने महिलांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. हा उपक्रम त्यातीलच एक होता. विभागप्रमुख अनिता शिंदे यांच्या ग्रुपने समृद्ध महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेल्या आपल्या सण- उत्सवांवर आधारित कार्यक्रम सादर केला. मृणाल पटवर्धन यांच्या ग्रुपने ’बाईपण भारी…’ हा अनोखा कार्यक्रम सादर करीत वाहवा मिळवली.
संजीवनी उन्हाळे आणि त्यांच्या सहकारी कस्तुरींनी ’मॅशअप’ या आधुनिक संकलपनेवर आधारित विविध गाण्यांवर केलेल्या समूहनृत्याला सभागृहातील प्रत्येकाने टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. सुनंदा डेरे यांच्या ग्रुपने कोळीनृत्य सादर केले. विभागप्रमुखांच्या फॅशन वॉकनेही प्रत्येकाचे लक्ष वेधले. श्रद्धा गायकवाड यांचे तांत्रिक सहकार्य मिळाले. डॉ. रेश्मा पुराणिक यांनी विभागप्रमुखांना आणि कस्तुरी सदस्यांना निरोगी आयुष्य कसे ठेवावे आणि त्यासाठी काय करावे, याबद्दल माहिती दिली.
डॉक्टरांच्या सल्ल्याने कर्करोग तपासणी करावी आणि कर्करोग होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, याबद्दलही त्यांनी सांगितले आणि कर्करोगासंदर्भात महिलांच्या प्रश्नांचे निरसन केले. बहारदार समूहनृत्यांनी रंगत वाढवली. हिंदी असो वा मराठी गाण्यांवर विभागप्रमुख आणि कस्तुरींनी नृत्य सादर केले. तसेच, भावगीते असो वा भक्तिगीतेही सादर केली. एकपात्री अभिनय… समूह अभिनय… फॅशन वॉकमधून पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून त्यांनी स्त्रीशक्तीचे दर्शन घडविले… अशा अनेक
Bharat Live News Media कस्तुरी क्लबसोबत कार्यक्रम सादर करण्याचा अनुभव खूप छान होता. कस्तुरींना आरोग्यासंबंधी जागरूक करण्यासह मी त्यांना निरोगी आयुष्य कसे जगावे, याबद्दल सांगितले. आरोग्याबद्दल त्यांच्यात जागरूकता असल्याचे पाहायला मिळाले.
– डॉ. रेश्मा पुराणिक
Bharat Live News Media कस्तुरी क्लबच्या सदस्यांचा उत्साह वाखाण्याजोगा होता. भविष्यातही आम्ही कस्तुरी क्लबसोबत काम करत राहू.
– उज्ज्वला नवले, सचिव, इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्ज
हेही वाचा
Raj Thackeray | आजपासून नाशिक दौऱ्यावर
कोल्हापूर : गल्लोगल्ली भटक्या कुत्र्यांची वाढतेय संख्या; निर्बीजीकरण प्रमाण वाढणार कधी?
‘बेस्ट ऑफ आशा’ या पुस्तकाचे अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन
Latest Marathi News कस्तुरी क्लब विभागप्रमुखांच्या कलाविष्काराला मिळाली दाद Brought to You By : Bharat Live News Media.