अजिंक्यतार्‍यावर मुलीचा आणि बिबट्याचा मृतदेह

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यातील किल्ले अजिंक्यतार्‍यावरील दक्षिण दरवाजापासून काही अंतरावर मुलीचा सडलेल्या अवस्थेत, तर बिबट्याचा त्याच परिसरात झाडावर मृतदेह आढळला. या घटनेने सातार्‍यात खळबळ उडाली असून, मृत युवती सातारा तालुक्यातील आहे. प्राथमिक अंदाजानुसार युवतीने आत्महत्या केली असून, ती एक महिन्यापासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. प्रतीक्षा दीपक कदम (वय 17, रा. नागठाणे, ता. सातारा) … The post अजिंक्यतार्‍यावर मुलीचा आणि बिबट्याचा मृतदेह appeared first on पुढारी.

अजिंक्यतार्‍यावर मुलीचा आणि बिबट्याचा मृतदेह

सातारा; Bharat Live News Media वृत्तसेवा : सातार्‍यातील किल्ले अजिंक्यतार्‍यावरील दक्षिण दरवाजापासून काही अंतरावर मुलीचा सडलेल्या अवस्थेत, तर बिबट्याचा त्याच परिसरात झाडावर मृतदेह आढळला. या घटनेने सातार्‍यात खळबळ उडाली असून, मृत युवती सातारा तालुक्यातील आहे. प्राथमिक अंदाजानुसार युवतीने आत्महत्या केली असून, ती एक महिन्यापासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. प्रतीक्षा दीपक कदम (वय 17, रा. नागठाणे, ता. सातारा) असे मृतदेह या मुलीचे नाव आहे.
बिबट्याचे 7 ते 8 महिन्यांचे पिल्लू
परिसरातील झाडावर मृतावस्थेत बिबट्या आढळल्याने वन विभागालाही पाचाराण करण्यात आले होते. वन विभागाने बिबट्याचा मृतदेह झाडावरून खाली घेतल्यानंतर प्रथमदर्शनी ते 7 ते 8 महिन्यांचे पिल्लू आहे. झाडाच्या फांदीत अडकल्याने त्याचा मृत्यू झाला असावा. बिबट्याच्या पिल्लाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.
Latest Marathi News अजिंक्यतार्‍यावर मुलीचा आणि बिबट्याचा मृतदेह Brought to You By : Bharat Live News Media.