राज्यातील तापमानाचा आलेख वाढला; सोलापूरचा पारा 38 अंशांवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात मागील आठवड्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. आता वातावरण पूर्ववत झाले असून, तापमानाचा पारा वाढू लागला आहे. बुधवारी राज्यात सोलापूर शहराचे तापमान 38.2 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. दक्षिण तामिळनाडू ते उत्तर कर्नाटकपर्यंत द्रोणीय क्षेत्र आता दक्षिण तामिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत आहे. असे असले तरी या भागात … The post राज्यातील तापमानाचा आलेख वाढला; सोलापूरचा पारा 38 अंशांवर appeared first on पुढारी.

राज्यातील तापमानाचा आलेख वाढला; सोलापूरचा पारा 38 अंशांवर

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यात मागील आठवड्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. आता वातावरण पूर्ववत झाले असून, तापमानाचा पारा वाढू लागला आहे. बुधवारी राज्यात सोलापूर शहराचे तापमान 38.2 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. दक्षिण तामिळनाडू ते उत्तर कर्नाटकपर्यंत द्रोणीय क्षेत्र आता दक्षिण तामिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत आहे. असे असले तरी या भागात किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मात्र, उर्वरित भागात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, मागील तीन ते चार दिवसांपासून कोरड्या हवामानामुळे ऊन हळूहळू तापू लागले आहे. कमाल तापमानाचा पारा 38 अंशांवर पोहोचला आहे. बुधवारी राज्यात सोलापूर शहर जिल्ह्याचे कमाल तापमान 38.2 अंशांवर पोहोचले. पुणे आणि परिसराचादेखील तापमानाचा पारा 36 अंशांवर आहे. राज्यात कोरडे हवामान राहिल्यामुळे उन्हाचा तडाखा हळूहळू वाढणार आहे. असे असले तरी रात्री आणि पहाटेच्या वेळी थंडी जाणवत आहे.
हेही वाचा

Paper Leak Case : परभणीत बारावी जीवशास्त्रचा पेपर फुटल्यामुळे खळबळ
देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते कोलकात्यात उद्घाटन
जितक्या जागा शिवसेनेला, तितक्याच राष्ट्रवादीला द्या; छगन भुजबळ यांची अपेक्षा

Latest Marathi News राज्यातील तापमानाचा आलेख वाढला; सोलापूरचा पारा 38 अंशांवर Brought to You By : Bharat Live News Media.