रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ९ रोजी दापोलीत सुमारे ४०० कोटींच्या कामांचे भूमिपूजन

खेड; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शनिवार (दि.९) दापोली मध्ये सुमारे ४०० कोटींच्या कामांचे भूमिपूजन होणार असून जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती दापोली खेड मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी दिली. बुधवारी (दि. ६) जामगे येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. दापोली विधानसभा मतदार संघातील सुमारे चारशे कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन … The post रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ९ रोजी दापोलीत सुमारे ४०० कोटींच्या कामांचे भूमिपूजन appeared first on पुढारी.

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ९ रोजी दापोलीत सुमारे ४०० कोटींच्या कामांचे भूमिपूजन

खेड; Bharat Live News Media वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शनिवार (दि.९) दापोली मध्ये सुमारे ४०० कोटींच्या कामांचे भूमिपूजन होणार असून जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती दापोली खेड मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी दिली. बुधवारी (दि. ६) जामगे येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.
दापोली विधानसभा मतदार संघातील सुमारे चारशे कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी आ.योगेश कदम यांनी बुधवारी (दि.६) सायंकाळी ५ वाजता जामगे येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आ.कदम म्हणाले, राज्यात महायूतीचे सरकार राज्यात आल्या नंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दापोली मतदार संघातील ज्या प्रमुख काही महत्वाच्या प्रकल्पांना चालना देण्याची विनंती केली होती. त्या पैकी ऐतिहासिक वारसा असलेल्या महत्वाचे असलेले हर्णे बंदर आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी २०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर दापोली उपजिल्हा रुग्णालय परिसरात १०० खाटांचे नवीन रुग्णालय ज्यामध्ये अतिदक्षता विभाग, रक्तपेढी, डायलिसिस सेंटर आदी सुविधा उपलब्ध असतील त्यासाठी २० कोटी २१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. खेड ते दापोली या प्रमुख राज्य मार्गासाठी ९८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून याकोण फाटा ते विसापूर रस्त्यासाठी ३५ कोटींचा निधी मंजूर झाला असल्याचे कदम यांनी सांगितले.
दापोलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री काळकाई देवस्थानच्या जीर्णोद्धार करण्यासाठी एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना ४ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद त्यांनी केली होती. या सर्व सुमारे चारशे कोटी रुपयांच्या कामांचा आता आरंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करून दि.९ रोजी दापोलीत होणार आहे. या कार्यक्रमांसाठी शिवसेना नेते रामदास कदम, राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, पालकमंत्री उदय सामंत देखील उपस्थित राहणार आहेत, असे आ.योगेश कदम म्हणाले.
Latest Marathi News रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ९ रोजी दापोलीत सुमारे ४०० कोटींच्या कामांचे भूमिपूजन Brought to You By : Bharat Live News Media.