पैठण : दहावीची परीक्षा देणाऱ्या पंधरा वर्षीय तरुणाचा नाथसागर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण शहरातील दहावीची परीक्षा देणाऱ्या एका पंधरा वर्षीय तरुणाचा नाथसागर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडले असून मृत्यू झालेल्या अबूजर महबूब शेख (वय १५ वर्ष रा. सादत मोहल्ला पैठण) असे तरुणाचे नाव आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पैठण शहरातील सादत मोहल्ला परिसरात रहिवासी अबूजर महबूब शेख हा आपल्या … The post पैठण : दहावीची परीक्षा देणाऱ्या पंधरा वर्षीय तरुणाचा नाथसागर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

पैठण : दहावीची परीक्षा देणाऱ्या पंधरा वर्षीय तरुणाचा नाथसागर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू

पैठण; Bharat Live News Media वृत्तसेवा : पैठण शहरातील दहावीची परीक्षा देणाऱ्या एका पंधरा वर्षीय तरुणाचा नाथसागर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडले असून मृत्यू झालेल्या अबूजर महबूब शेख (वय १५ वर्ष रा. सादत मोहल्ला पैठण) असे तरुणाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पैठण शहरातील सादत मोहल्ला परिसरात रहिवासी अबूजर महबूब शेख हा आपल्या मित्रासोबत नाथसागर धरणात पोहण्यासाठी जालन्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊस जवळ मंगळवारी (दि.५) दुपारी चार वाजता गेला होता. परंतु धरणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने अबूजर महबूब शेख पाण्यात बुडाला. सदरील परिसरात कोणीच नसल्यामुळे या घटनेची माहिती अबूजर शेख सोबत आलेल्या मित्राने या घटनेची माहिती घाबरल्यामुळे कोणालाही सांगितली नाही. दहावीचा परीक्षा देणारा तरुण मुलगा घरी न आल्यामुळे आई वडील व नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा बेपत्ता असल्याचे सांगितले. यानंतर सोबत असलेल्या आरिफ जावेद शेख या मित्राने बुधवारी दि.६ रोजी अबूजर शेख पाण्यात बुडाल्याची माहिती दिल्यामुळे तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि ईश्वर जगदाळे व नातेवाईकांनी घटनास्थळ धाव घेऊन अबूजर शोध घेण्यास प्रारंभ केले. या दरम्यान धरणात मासेमारी करणाऱ्या युवकाच्या मार्फत शोध घेत असताना सदरील तरुणाचे मृतदेह आढळून आले. या घटना संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मित नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे,सपोनि ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार गणेश खंडागळे हे करीत आहे.
Latest Marathi News पैठण : दहावीची परीक्षा देणाऱ्या पंधरा वर्षीय तरुणाचा नाथसागर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.