बीड : प्रॉपर्टीच्या वादातून पतीचा खून; पत्नीला अटक

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : प्रॉपर्टीच्या वादातून पतीचा खून करून त्याचे जीवन संपवल्याचा बनाव केल्याची धक्कादायक घटना गेवराई  तालुक्यात उघडकीस आली. तालुक्यातील धोंडराई येथे मंगळवारी (दि.५) रात्री ही घटना घडली. सुनिल निवृत्ती चातूर ( वय ४३ रा. धोंडराई ता. गेवराई) असे मृत पतीचे नाव असून याप्रकरणी पत्नी शारदा सुनिल चातूर ( वय ३५) हिला अटक करण्यात … The post बीड : प्रॉपर्टीच्या वादातून पतीचा खून; पत्नीला अटक appeared first on पुढारी.

बीड : प्रॉपर्टीच्या वादातून पतीचा खून; पत्नीला अटक

गेवराई, Bharat Live News Media वृत्तसेवा : प्रॉपर्टीच्या वादातून पतीचा खून करून त्याचे जीवन संपवल्याचा बनाव केल्याची धक्कादायक घटना गेवराई  तालुक्यात उघडकीस आली. तालुक्यातील धोंडराई येथे मंगळवारी (दि.५) रात्री ही घटना घडली. सुनिल निवृत्ती चातूर ( वय ४३ रा. धोंडराई ता. गेवराई) असे मृत पतीचे नाव असून याप्रकरणी पत्नी शारदा सुनिल चातूर ( वय ३५) हिला अटक करण्यात आली आहे.
सुनिल चातुर याने मंगळवारी रात्री जीवन संपवल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पत्नीला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवत तिची कसून चौकशी केली. त्यावेळी पतीसोबत पटत नसल्यामुळे व प्रॉपर्टीच्या वादातून पतीचा गळा दाबून खून करून त्याच्या आत्महत्येचा बनाव केल्याची तिने कबुली दिली. याप्रकरणी पत्नीला अटक केली असून तिच्यावर गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास एपीआय सतीश कोटकर करत आहेत.
हेही वाचा :

परभणी : टेम्पोच्या धडकेत मजूर जागीच ठार, एक गंभीर
छ. संभाजीनगर: मेहबूबखेडा येथे बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू
गोवा : कासारवर्णे अपघातात कळणेची युवती ठार

Latest Marathi News बीड : प्रॉपर्टीच्या वादातून पतीचा खून; पत्नीला अटक Brought to You By : Bharat Live News Media.