ठाणे : पारसिक नगरमध्ये भंगार साहित्य व कचऱ्याला भीषण आग

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या भंगार साहित्य आणि आणि कचऱ्याला बुधवारी सांयकाळी आग लागली. काही वेळातच ही आग वाढल्याने बाजूच्या इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीच्या बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आग लागल्याने इमारतीच्या मागील बाजूच्या सर्व रूमच्या खिडकीच्या काचा फुटून नुकसान झाले. दरम्यान रात्री … The post ठाणे : पारसिक नगरमध्ये भंगार साहित्य व कचऱ्याला भीषण आग appeared first on पुढारी.

ठाणे : पारसिक नगरमध्ये भंगार साहित्य व कचऱ्याला भीषण आग

ठाणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या भंगार साहित्य आणि आणि कचऱ्याला बुधवारी सांयकाळी आग लागली. काही वेळातच ही आग वाढल्याने बाजूच्या इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीच्या बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आग लागल्याने इमारतीच्या मागील बाजूच्या सर्व रूमच्या खिडकीच्या काचा फुटून नुकसान झाले. दरम्यान रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरु होते.
बुधवारी (दि. ६) सांयकाळी ५ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार ओम साई सोसायटी, बिल्डिंग नंबर- ९, अमृतांगण, पारसिक नगर, खारेगाव येथील ओम साई सोसायटीच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये साठा केलेल्या भंगार साहित्य व कचऱ्याला आग लागली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी तात्काळ पोलीस अधिकारी व कर्मचारी, ठाणे महापालिकेचे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी – ०१ बस वाहनासह तसेच अग्निशमन दलाचे जवान ०४-फायर वाहनासह, ०३- वॉटर टँकर, ०१-रेस्क्यू वाहन हजर झाले. या आगीमुळे जवळच असलेल्या ओम साई सोसायटी (इमारत तळ+७ मजली) या इमारतीमधील रहिवासी सुरक्षिततेच्या कारणास्तव इमारती बाहेर काढण्यात आले. आगीमुळे इमारतीच्या मागील बाजूच्या सर्व रूमच्या खिडकीच्या काचा फुटून नुकसान झाले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आलेला कचरा आणि भंगार साहित्यामुळे काही क्षणातच आग मोठ्या प्रमाणात वाढली. आगीचे लोट उंचावर दिसून येत होते. अग्निशमन दलाचे जवान तसेच आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्याकडून विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरु होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप पुढे आलेले नाही.
Latest Marathi News ठाणे : पारसिक नगरमध्ये भंगार साहित्य व कचऱ्याला भीषण आग Brought to You By : Bharat Live News Media.