बारामती बसस्थानकावर महिलेचे सव्वा लाखाचे दागिने लंपास
बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामतीचे तात्पुरत्या स्वरूपात कसब्यात स्थलांतरीत झालेले बसस्थानक चोरट्यांचा अड्डा बनले आहे. प्रवाशांकडील सोने, रोख रक्कम चोरण्याचे प्रकार येथे वाढले आहेत. भाऊबीजेच्या दिवशी एका महिलेकडील दीड लाखाचे दागिने चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच आता दुसर्या प्रवाशी महिलेचे 1 लाख 26 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत.
या प्रकरणी किरण विलास पिंगळे (रा. पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार शनिवारी (दि. 18) ही घटना घडली. फिर्यादी पत्नीसह निरेतून बारामती बसस्थानकावर आले.
संबंधित बातम्या :
कुकडी कालव्यांची दुरवस्था; अस्तरीकरणाअभावी पाणीगळती
Visakhapatnam Accident : शाळकरी मुले थोडक्यात बचावली, भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
तेथून ते इंदापूरला जाणार्या बसमध्ये बसत होते. यावेळी स्थानकावर मोठी गर्दी होती. आतमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्या पत्नीने पर्स पाहिली असता पर्सची चैन उघडी असल्याचे दिसून आले. पर्समध्ये ठेवलेली दोन्ही मंगळसूत्रे दिसून आली नाहीत. त्यांनी शोध घेतला; परंतु ते मिळाले नाहीत. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने पर्सची चैन उघडून मंगळसूत्र चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बारामतीचे स्थलांतरित बसस्थानक चोरट्यांसाठी अतिशय सोयीचे झाले आहे, तर प्रवाशांसाठी खिशाला चाट बसणारे ठरत आहे. आठवड्यात दोन ते तीनदा येथे महिलांच्या पर्समधील, गळ्यामधील दागिने चोरीच्या घटना घडत आहेत. त्यातून मनस्ताप वाट्याला येत आहे. भाऊबीजेच्या दिवशी माहेरी निघालेल्या महिलेकडील दीड लाखांचे दागिने लंपास झाले होते. त्यानंतर आता पुन्हा दुसरी घटना घडली आहे.
The post बारामती बसस्थानकावर महिलेचे सव्वा लाखाचे दागिने लंपास appeared first on पुढारी.
बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामतीचे तात्पुरत्या स्वरूपात कसब्यात स्थलांतरीत झालेले बसस्थानक चोरट्यांचा अड्डा बनले आहे. प्रवाशांकडील सोने, रोख रक्कम चोरण्याचे प्रकार येथे वाढले आहेत. भाऊबीजेच्या दिवशी एका महिलेकडील दीड लाखाचे दागिने चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच आता दुसर्या प्रवाशी महिलेचे 1 लाख 26 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. या प्रकरणी किरण विलास पिंगळे …
The post बारामती बसस्थानकावर महिलेचे सव्वा लाखाचे दागिने लंपास appeared first on पुढारी.