बीड : मनोज जरांगे यांच्यासह २०० जणांवर गुन्हे दाखल

बीड, पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या होत्या. या प्रकरणी जरांगे यांच्यासह दीडशे ते दोनशे आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड शहरातील नाळवंडी नाका भागात तसेच बीड तालुक्यातील उंमरद फाटा येथे सभा घेतल्या. विनापरवानगी सभा आयोजन करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, जेसीबीचा … The post बीड : मनोज जरांगे यांच्यासह २०० जणांवर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

बीड : मनोज जरांगे यांच्यासह २०० जणांवर गुन्हे दाखल

बीड, Bharat Live News Media वृत्तसेवा: मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या होत्या. या प्रकरणी जरांगे यांच्यासह दीडशे ते दोनशे आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बीड शहरातील नाळवंडी नाका भागात तसेच बीड तालुक्यातील उंमरद फाटा येथे सभा घेतल्या. विनापरवानगी सभा आयोजन करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, जेसीबीचा असुरक्षितरित्या वापर करणे, या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये पेठ बीड पोलीस ठाण्यात जरांगे यांच्यासह इतर दीडशे तर पिंपळनेर पोलीस ठाण्यात आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, यापूर्वी बीडच्या अमळनेर आणि शिरूर पोलीस ठाण्यात जरांगे यांच्यावर रास्ता रोको केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा 

वेध लोकसभेचे : सातार्‍याचे क्रांतिसिंह झाले बीडचे खासदार
बीड: राक्षसभुवनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांविरूद्ध गुन्हा
बीड : पांढरवाडी पुलाजवळ दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Latest Marathi News बीड : मनोज जरांगे यांच्यासह २०० जणांवर गुन्हे दाखल Brought to You By : Bharat Live News Media.