संदेशखाली प्रकरण : शहाजहान शेख सीबीआयच्या ताब्यात
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : शाहजहान शेख प्रकरणात पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारला बुधवारी (दि. ६) कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने शाहजहान शेख यांना आज ४.१५ पर्यंत सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्यापही त्यांना ताब्यात घेण्यात आलेले नव्हते. आज (दि. ६) सायंकाळी सीबीआय केंद्रीय सुरक्षा दलाने शहाजहान यांना ताब्यात घेतले.
संदेशखाली येथे ईडीच्या अधिकाऱ्यांवर ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला होता. शहाजहान शेख यांना ताब्यात घेण्यासाठी उच्च न्यायायाने दिलेली मुदत उलटून गेली आहे. बंगाल पोलीस आरोपींना सीबीआयच्या ताब्यात देतील की नाही याबाबत अजूनही शंका कायम होती. मंगळवारी हायकोर्टाच्या आदेशानंतर ईडी टीमवर हल्ला करणाऱ्या शाहजहानला पोलिसांनी सीबीआयकडे सोपवण्यास नकार दिला होता. मात्र आज (दि. ६) सायंकाळी उशिरा सीबीआयचे पथक भाबानी भवन पोलीस मुख्यालयाबाहेर दाखल झाले आणि शहाजहान यांना ताब्यात घेतले.
याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकराने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत नाही, तोपर्यंत आरोपीचा ताबा सीबीआयकडे देता येणार नाही, असं पश्चिम बंगाल पोलिसांकडून सांगण्यात आलं होते.
नेमकं प्रकरण काय आहे?
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित रेशन वितरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ५ जानेवारी रोजी ईडीचे पथक तृणमूल काँग्रेसचे माजी नेते शेख शहाजहान यांच्या उत्तर २४ परगना जिल्ह्यातील निवासस्थानी छापा टाकण्यासाठी जात होते. यावेळी रस्त्यातच ईडीच्या पथकावर हल्ला करण्यात आला होता. तसेच अधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. हा हल्ला शेख शहाजहान याच्या समर्थकांनी केल्याचा आरोप येत होता. याप्रकरणी शेख शहाजहान यांना २९ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. याशिवाय शहाजहान आणि त्याच्या साथीदारांवर संदेशखालीतील अनेक महिलांनी लैंगिक छळ आणि जमीन हडप केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
#WATCH | Kolkata, West Bengal | Sandeshkhali accused Shahjahan Sheikh being brought out of Bhabani Bhaban Police Headquarters by the CBI team. He has been handed over to the CBI.
Calcutta High Court today observed that investigation into the attack on ED officials should be… pic.twitter.com/IiZ5wk0tG3
— ANI (@ANI) March 6, 2024
हेही वाचा
‘शहाजहान शेखला अटक करा’ : ‘संदेशखाली’ प्रकरणी प. बंगाल सरकारला न्यायालयाने फटकारले
Navneet Rana : नवनीत राणा यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी, देशातील मोठ्या नेत्यांचीही घेतली नावे
केरळमधील शाळेत रुजू झाली देशातील पहिली AI Teacher ! जाणून घ्या सविस्तर
Latest Marathi News संदेशखाली प्रकरण : शहाजहान शेख सीबीआयच्या ताब्यात Brought to You By : Bharat Live News Media.