देशातील पहिले फुले अमृतकाळ पशुसल्ला मोबाईल ॲप लाँच
मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रातंर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्यावतीने विकसित केलेल्या देशातील पहिल्या ‘फुले अमृतकाळ’ या पशुसल्ला मोबाईल प्रणालीचे (ॲप) लोकार्पण आज (दि.६) कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. Phule Amritkal Pashusalla mobile app
यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संग्राम जगताप, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू कर्नल डॉ. पी.जी. पाटील तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते. Phule Amritkal Pashusalla mobile app
वातावरणीय बदलामुळे पावसाने दिलेली ओढ, अतिवृष्टी, ढगफुटी, वाढते तापमान, उष्माघात व पावसाचा अकल्पित लहरीपणा अशा गोष्टी वारंवार घडत आहेत. त्यामुळे पशुधनास चारा व पाणी पुरविण्यावर तर परिणाम होतच आहे, पण पशुधनाच्या आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होत आहे. संकरीत गाई व म्हशींमध्ये दुग्ध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. दुभत्या गाईचे दूध उत्पादन ५ ते २० टक्क्यांपर्यंत घटल्याचे आढळून आले आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी हे ॲप महत्वाची भूमिका पार पाडेल, असे मुंडे यांनी सांगितले.
या ॲपचाद्वारे शेतकऱ्यांना जनावरांचा उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी गोठ्यातील तापमान घटविण्याकरिता व योग्य आर्द्रता राखण्याकरिता सावलीची सोय करणे, योग्य वायु विजन राखणे, पिण्याकरिता थंड पाणी उपलब्ध करून देणे, फॅन किंवा फॉगर यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने सुरू करणे. संतुलित आहार नियोजन इत्यादी उपाययोजना करण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या जातील.
ॲपचा वापर असा करावा
या ॲपचा वापर करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून Phule Amrutkal हे ॲप डाऊनलोड करावे. (लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.dairy.thi) त्यानंतर आपण नोंदणी करून आपला मोबाईल नंबर टाकावा. ओटीपी मिळाल्यानंतर आपला पत्ता व लोकेशन टाकून ॲप चालू करावे. आपणास हव्या असलेल्या गाईंच्या गोठ्याचे किंवा स्थळाचे लोकेशन घेऊन त्या ठिकाणीचे तापमान आद्रता निर्देशांक मिळतो. त्याद्वारे गाईंचा ताण ओळखून सल्ला मिळू शकतो. हे ॲपचा ओपन सोर्स हवामान माहितीच्या बरोबरीनेच तापमान व आर्द्रतेचे सेन्सर्स वापरून मिळणाऱ्या प्रत्यक्ष माहितीच्या माध्यमातून तापमान आर्द्रता निर्देशांकाच्या आधारे शेतकऱ्यांना व्यक्तिगत सल्ला व सूचना पुरवते.
हेही वाचा
Vijay Vadettiwar On Eknath Shinde : मुंबईतील सदनिका घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त आहे का? : वडेट्टीवार
Lok Sabha Election 2024 : मुंबईत भाजपचा ५ जागांवर लढण्याचा प्रस्ताव, शिदेंना प्रस्ताव अमान्य
व्वा याला म्हणतात ‘स्पीड’..! ‘मुंबई इंडियन्स’च्या शबनिमने टाकला सर्वात वेगवान चेंडू
Latest Marathi News देशातील पहिले फुले अमृतकाळ पशुसल्ला मोबाईल ॲप लाँच Brought to You By : Bharat Live News Media.