जीव माझा गुंतला फेम योगिता चव्हाण अडकली विवाह बंधनात
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून अंतरा म्हणजे, मराठी अभिनेत्री योगिता चव्हाण चाहत्याच्या घराघरांत पोहोचली आहे. या मालिकेत तिने रिक्षा चालवणाऱ्या एका मुलीची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. आता योगिताने ( Yogita Chavan ) रिअल लाईफमध्ये अभिनेता सौरभ चौघुले याच्यासोबत लग्न बंधनात अडकली आहे. या लग्नातील काही खास क्षणाचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलं आहेत.
संबंधित बातम्या
Pooja Sawant Halad : साजणा तू..सावरलं! पूजा सावंतचे हळद समारंभाचे फोटो व्हायरल
Indrayani TV Serial : अवखळ इंदू येतेय भेटीला, “इंद्रायणी”च्या शीर्षकगीताला पसंती
ओडेला २ नंतर तमन्ना भाटिया नीरज पांडेच्या नव्या चित्रपटात दिसणार?
अभिनेत्री योगिता चव्हाण ( Yogita Chavan ) हिने अभिनेता सौरभ चौघुलेसोबत नुकतेच मोठ्या थाटामात लग्न केलं. या लग्नातील काही खास फोटो आणि व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्रामव शेअर केलं आहेत. यावेळी योगिताने डार्क ब्राऊन नऊवारी साडीवर ग्रीन कवलरचा ब्लॉऊजमध्ये वनवधूच्या वेशभुषेत खूपच क्यूट दिसत होती. तर सौरभने व्हाईट शेरवानीवर ग्रीन कलरचा शेला- फेटा घेतला होता. तोही खूपच हँडसम दिसत होता. यावेळी कपलच्या गळ्यात फुंलाच्या माळ्या दिसत होत्या. हातात हिरवा चुडा- अंगठी, केसांचा अंबाडा, त्यावर गजरा, गळ्यात दागिने आमि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केलाय.
‘Forever Humsafar 🧿’. फोटोला अशी कॅप्शन तिने लिहिलीय. या कार्यक्रमात कपल आनंदीत असून दोघांनी रोमॉन्टिक फोटोसोबत डान्सही केला आहे. लग्नातील सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळीही आनंदीत आहेत. दोघे कपल मोठ्या उत्साहात एकमेंकाना हार घालताना आणि सात फेरे घेताना दिसत आहे. हे फोटो शोसल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी दोघांवर भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय. या सोहळ्यातील व्हिडिओला जवळपास ७० हाजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.
View this post on Instagram
A post shared by Saorabh Rajnish Choughule (@mesaorabh)
View this post on Instagram
A post shared by Yogita Chavan (@official_chavan_yogita)
View this post on Instagram
A post shared by Yogita Chavan (@official_chavan_yogita)
View this post on Instagram
A post shared by Yogita Chavan (@official_chavan_yogita)
View this post on Instagram
A post shared by Yogita Chavan (@official_chavan_yogita)
View this post on Instagram
A post shared by Yogita Chavan (@official_chavan_yogita)
Latest Marathi News जीव माझा गुंतला फेम योगिता चव्हाण अडकली विवाह बंधनात Brought to You By : Bharat Live News Media.