निक्की हेली अमेरिका अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर, ट्रम्‍प यांचा मार्ग मोकळा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : निक्की हेली यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीतून बाहेर पडण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍याच्‍या या निर्णयामुळे आता डोनाल्‍ड ट्रम्‍प यांची रिपब्लिकन उमेदवारीसाठीचा दावा आणखी प्रबळ झाला आहे. आता नोव्‍हेंबर २०२४ मध्‍ये अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांच्यात थेट सामना होणार आहे, असे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे. दरम्‍यान, दक्षिण कॅरोलिना राज्याची … The post निक्की हेली अमेरिका अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर, ट्रम्‍प यांचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.

निक्की हेली अमेरिका अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर, ट्रम्‍प यांचा मार्ग मोकळा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : निक्की हेली यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीतून बाहेर पडण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍याच्‍या या निर्णयामुळे आता डोनाल्‍ड ट्रम्‍प यांची रिपब्लिकन उमेदवारीसाठीचा दावा आणखी प्रबळ झाला आहे. आता नोव्‍हेंबर २०२४ मध्‍ये अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांच्यात थेट सामना होणार आहे, असे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे. दरम्‍यान, दक्षिण कॅरोलिना राज्याची राजधानी चार्ल्सटन येथे एका भाषणात त्‍या आपला निर्णय जाहीर करणे अपेक्षित असल्‍याचे मानले जात आहे.
५२ वर्षीय निक्‍की हेली या संयुक्‍त राष्‍ट्रातील अमेरिकेच्‍या माजी राजदूत आहेत. हेली या रिपब्लिकन पक्षातील ट्रम्‍प यांच्‍या प्रबळ प्रतीस्‍पर्धी मानल्‍या जात होत्‍या. त्‍याने न्यू हॅम्पशायरमध्ये मोठ्या फरकाने मतदारांचे समर्थन मिळवले होते. तसेच दक्षिण कॅरोलिनामध्ये जवळपास 40% मते मिळविली होती. 3 मार्च रोजी त्‍यांनी रिपब्लिकन प्राइमरीमध्ये 62.9% मतांसह विजय मिळवला हाेता. मात्र डोनाल्ड ट्रम्प हे अन्‍य राज्यात आघाडी राखत असल्‍याने निक्‍की हेली यांनी अध्यक्षपद निवडणुकीतून बाहेर पडण्‍याचा निर्णय घेतल्‍याचे मानले जात आहे.

BREAKING: Nikki Haley plans to end her presidential campaign, a decision that will ensure that Donald Trump will win the Republican nomination and once again face Democratic President Joe Biden in November’s election https://t.co/SRZERuQUzf pic.twitter.com/PwC5Wq2UOl
— Reuters (@Reuters) March 6, 2024

दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर असणार्‍या हेली फेब्रुवारी 2023 मध्ये शर्यतीत प्रवेश करणाऱ्या पहिल्या रिपब्लिकन स्पर्धकांपैकी होत्या. परराष्ट्र धोरणातील कौशल्यामुळे या निवडणुकीत त्‍या चर्चेत होत्‍या. त्‍यांनी चीन आणि रशियाबद्दल ठोस भूमिका घेतली होती. तसेच युक्रेनला सतत मदत करण्याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले होते. त्‍यांच्‍या या भूमिकेला ट्रम्प समर्थकांचा विरोध होता. वाद-विवादामध्‍ये त्‍यांनी ट्रम्‍प यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. त्यांच्या मानसिक सूक्ष्मतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
निक्की हेली यांनी राजधानी वॉशिंग्टन डीसीच्या प्राथमिक निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला होता. रिपब्लिकन पक्षाकडून प्रायमरी जिंकणाऱ्या निक्की हेली अमेरिकेच्या इतिहासातील पहिली महिला उमेदवार ठरल्या होत्‍या.
डोनाल्ड ट्रम्प यांनी टेक्सास आणि कॅलिफोर्नियासह 15 पैकी 14 प्राथमिक निवडणुका जिंकल्या. व्हरमाँटमध्ये निक्की हॅलीच्या आश्चर्यकारक विजय झाला. दरम्‍यान अपेक्षेप्रमाणे डेमोक्रॅटिकचे नामांकन स्पर्धेत अमेरिकेचे अध्यक्ष ज्‍यो बायडेन यांनी सर्व 15 राज्ये जिंकली. त्‍यांनी आतापर्यंत 20 पैकी 19 स्पर्धा जिंकल्या आहेत आणि त्याच्या एकूण प्रतिनिधींची संख्या चौपटीने वाढली आहे. तो 19 मार्चपर्यंत नामांकन मिळवण्यासाठी पुरेसे प्रतिनिधी जिंकण्याच्या मार्गावर आहे, असे वृत्त एपीने दिले आहे.
Latest Marathi News निक्की हेली अमेरिका अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर, ट्रम्‍प यांचा मार्ग मोकळा Brought to You By : Bharat Live News Media.