खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: खासदार नवनीत राणा यांना एका आंतरराष्ट्रीय व्हॉट्सअॅप क्रमांकावरून जीवे मारण्याची आणि उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप वर एक ऑडिओ क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याने मोठमोठ्या नेत्यांची नावे घेत बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची भाषा वापरली आहे. बुधवारी (दि.6) आमदार रवी राणा यांनी यासंदर्भात माहिती देत खासदार राणा यांना … The post खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी appeared first on पुढारी.

खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी

अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा: खासदार नवनीत राणा यांना एका आंतरराष्ट्रीय व्हॉट्सअॅप क्रमांकावरून जीवे मारण्याची आणि उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप वर एक ऑडिओ क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याने मोठमोठ्या नेत्यांची नावे घेत बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची भाषा वापरली आहे. बुधवारी (दि.6) आमदार रवी राणा यांनी यासंदर्भात माहिती देत खासदार राणा यांना अफगाणिस्तान व पाकिस्तानातून ही धमकी आल्याचे सांगितले. केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास करावा असेही ते म्हणाले. Navneet Rana
गेल्या काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या हिंदुत्व आणि भाजपचा जोरदार पुरस्कार करत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वीच संसदेमध्ये एमआयएमचे खासदार ओवेसी यांच्यात शाब्दिक वाद देखील झाला होता. त्यामुळे आम्हाला ओवेसींच्या आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांच्या धमक्या आल्या होत्या. मात्र आम्ही त्याला भीक घातली नाही, असे आमदार रवी राणा म्हणाले. Navneet Rana

मात्र, आता थेट पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवरून आंतरराष्ट्रीय क्रमांकाद्वारे धमक्या दिला जात आहेत. धमकी देणाऱ्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मोहन भागवत आणि टी राजा सिंह यांची देखील नावे घेतली असे आमदार राणा यांनी सांगितले. या प्रकरणी अमरावती शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासोबत देखील आमदार राणा यांनी संवाद साधत त्यांना याबाबत माहिती दिली आहे.

संसदेमध्ये एमआयएमचे प्रमुख ओवेसी यांच्याबरोबर झालेल्या वादानंतरच खासदार नवनीत राणा यांना मोठ्या प्रमाणात धमक्या येत होत्या. संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनीही अनेकदा जाहीर सभेतून खासदार राणा यांना थेट इशारा दिला. मात्र आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. आता थेट व्हॉट्सअॅप वर मेसेज आणि ऑडिओ क्लिप पाठवून धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची लिंक कुठे जुळते, याचा तपास केंद्रीय यंत्रणांनी करावा, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली.

हेही वाचा
 

 खा. नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र देण्यास राज्य सरकारचा नकार
नवनीत राणा जात प्रमाणपत्राचा निकाल लोकसभेपूर्वी? 
नवनीत राणा अजित पवार गटाकडून लोकसभा लढवणार?

Latest Marathi News खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी Brought to You By : Bharat Live News Media.